सोशल मीडियाच्या युगात आता गाणी आणि रील्सला प्रांत आणि भाषेची मर्यादा राहिलेली नाही. आता भोजपुरी, मराठी किंवा बंगाली गाणी अशा सर्वच गाण्यांवर देशभरातील रील्स क्रिएटर व्हिडिओ तयार करताना दिसतात. नुकतंच उत्तराखंडमधील कुमाऊंनी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक इंदर आर्य याचं 'ठुमक-ठुमक' हे गाणं देशभरात प्रचंड व्हायरल झालं आहे. याच गाण्यावर एका अभिनेत्रीचा रिल्स प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या रिल्सचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. (Latest Marathi News)
उत्तराखंडचा रॉकस्टार म्हणून नावलौकीक असलेला इंदर आर्यच्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इंदरच्या संगीत कार्यक्रमांनाही चाहत्यांची मोठी गर्दी असते. इंदरच्या गाण्याला युट्युबवरही पसंती मिळताना दिसत आहे. त्याचं एक पहाडी गाणं रिल्स क्रिएटर्सना देखील भावलं आहे. पाच रिल्सस्टार पैकी तिसरा रिल्सस्टार इंदरच्या पहाडी गाण्यावर रिल्स तयार करताना दिसतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंदरच्या पहाडी गाण्यावर अभिनेत्री रिचा छेत्रीलाही रिल्स तयार करण्याचा मोह आवरला नाही. तिनेही रिल्स तयार करून या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. तिच्या ठुमक्यांवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
रिचा छेत्रीच्या रिल्सवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'या पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये प्रवेश कसा मिळेल? अशी एकाने कमेंट्स केली आहे. 'मॅडम, लॉकअपमध्ये एका व्यक्तीसाठी जागा रिकामी आहे का? अशीही एक कमेंट्स नेटकऱ्याने दिले आहे.
रिचाच्या व्हिडिओला चार लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी रिल्सवर सहा हजारांहून अधिक कमेंट्स केल्या आहेत. तर साठ हजारांहून अधिक जणांनी तिचा रिल्स शेअर केला आहे. तिचा व्हिडिओ पाच मिलियन्सहून अधिक जणांनी व्हिडिओ पाहिला आहे. पोलिसांच्या गणवेशात तिने रिल्स केल्याने तिला बहुतेक जम पोलीस कर्मचारी समजू लागले आहेत. मात्र, तिने मी पोलीस कर्मचारी नसून अभिनेत्री असल्याचं स्पष्ट केलं आहे.
इंदरच्या पहाडी गाण्याचं अर्थ काय?
अभिनेत्री रिचा छेत्रीने 'ठुमक-ठुमक' गाण्यावर रिल्स तयार केलाय, ते गाणं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याचा अर्थही मस्त आहे. 'ठुमके देत जेव्हा तू डोंगराळ भागातील रस्त्यावरून चालशील. तेव्हा तुझ्या पायातील पैंजणाचा आवाज येईल. तुझ्या हातातील लाल-हिरव्या बांगड्या, तुझी चमकणारी चोळी आणि गुलाबी शरारा', असा या गाण्याचा अर्थ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.