Gautami Patil Viral Video: सोशल मीडिया स्टार आणि लावणी कलावंत गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमीचा डान्स आणि तिचे फोटो चाहत्यांना चांगलेच भावतात. तिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते. तसेच तिच्या कार्यक्रमाला तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळते. याचदरम्यान, गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (latest Marathi News)
गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आता राज्यातील गावागावात होत आहे. राज्यातील बहुतेक तरुणांना गौतमीने अक्षरश: वेड लावले आहे. तिचे अनेक कार्यक्रम वादग्रस्त देखील ठरले आहेत. गौतमीवर तरुणांचं प्रेम ओसंडून वाहत आहे. तर दुसरीकडे तिच्यावर मनोरंजन सृष्टीतील कलाकारांकडून टीका देखील होत आहे.
कालच अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी गौतमीच्या नृत्यावर मत व्यक्त केलं. "या सगळ्या गोष्टींना बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत," असे परखड मत त्यांनी व्यक्त केलं.
गौतमीवर टीका जरी होत असली तरी तिची लोकप्रियता आणखी वाढताना दिसून येत आहे. गौतमीला पुणे,कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या मिळत आहेत. याचदरम्यान, गौतमीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. भरकार्यक्रमात मंचावर एक 'टेडी'ने गौतमीचा मुका घेतला आहे. या 'टेडी'वर 'चतूर गॅरेज वाला' असे नाव लिहिले आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी टीका देखील केली आहे. एका युजरने व्हिडिओ पाहून महाराष्ट्राची बिहारशी तुलना केली आहे. तर दुसऱ्या युजरने थेट गौतमी पाटीलला सुधारण्याचा सल्ला दिला आहे.
गौतमी पाटील वादग्रस्त का ठरली?
गौतमी पाटील मूळची धुळे जिल्ह्याची आहे. तिने लावणी डान्सर म्हणून स्वत:ची ओळख केली आहे. आजकाल एखादा गावात कोणता कार्यक्रम असला तरी गौतमी पाटीलला बोलावले जाते.
पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला देखील आता गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. गौतमीने सप्टेंबर २०२२ मध्ये एका कार्यक्रमात डान्स करताना आक्षेपार्ह स्टेप्स केली होती. त्यानंतर गौतमी खूप ट्रोल झाली होती. या स्टेप्सनंतर गौतमीने माफी देखील मागितली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.