A viral video claims gold can be extracted from SIM cards, but what is the real truth? Saam Tv
व्हायरल न्यूज

तुमच्या सिम कार्डमध्ये सोनं? सिमकार्डमधील सोनं विकून 27 लाख कमावले?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय...तुमच्या मोबाईलच्या सिममध्ये सोनं असतं असा दावा करण्यात आलाय...एका व्यक्तीने सिममधून 27 लाख कमावल्याचा दावा केलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

या व्हिडिओत जो दावा केलाय ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल...तुम्ही वापरत असलेल्या सिमकार्डमध्ये सोनं असतं असा दावा करण्यात आलाय...एका व्यक्तीने सिमकार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून सोने काढल्याचा दावा केलाय...सध्या सोन्याचे दर गगनाला भिडलेयत...आणि सिमकार्डमध्ये सोनं असतं हा दावा केल्यानं याची अनेकांना उत्सुकता आहे...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...

हा व्हिडिओत एका चिनी माणसाने सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून सोनं काढून 26 लाखांचे सोने गोळा केल्याचा दावा केलाय...खरंच सिममध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्स चिपमध्ये सोनं असतं का...? त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...आमच्या टीमने याबाबत एक्सपर्टकडून माहिती घेतली...

सिम कार्ड, इलेक्ट्रॉनिक चिप्समध्ये सोनं वापरलं जातं

सोन्याच्या पातळ थर चिपवर लावला जातो

कनेक्टिव्हिटी आणि करंट फ्लोसाठी लावले जाते

सोन्याचं प्रमाण खूपच कमी असतं

चिनी माणसाने हे सोने फक्त एक किंवा काही सिम कार्डमधून काढलं नाही...त्याने मोठ्या प्रमाणात जुने सिम कार्ड, मोबाईलचे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा केला...त्यानंतर त्याने एका विशेष रासायनिक प्रक्रियेचा वापर करून धातू वेगळे केले...सिममध्ये थोडं सोनं असतं हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय...पण, हे सोनं किंचित असतं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

अकोल्यात पुन्हा राडा, काँग्रेस नगरसेवकावर हल्ला, कारच्या काचा फोडल्या

सम्राट झाले बिहारचे चौधरी, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

CBSE बोर्डचे पूर्ण नाव काय? नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Maharashtra News Live Update: अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील ४ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT