A fact-check graphic debunking a viral AI-generated audio falsely claiming ₹2000 financial aid in PM Modi’s voice. Saam Tv
व्हायरल न्यूज

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ, मेसेजची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...आता एक ऑडिओ क्लीप व्हायरल होतेय...यात मोदींचा आवाज असून, गरिबांना 2 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा केलाय...पण, खरंच गरिबांना पैसे मिळणार आहेत का...?

Sandeep Chavan

हा ऑडिओ ऐकलात...यात मोदींचा आवाज ऐकायला येतोय...आणि मोदी 26 जानेवारीपासून गरिबांना 2 हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा करतायत...पण, खरंच केंद्र सरकारने आता गरिबांसाठी योजना सुरू केलीय का...? 2 हजार रुपये मिळणार असतील तर ते कसे मिळणार...? या दाव्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...

मोदींच्या आवाजामुळे अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय...गरिबांना पैसे कसे मिळणार...? गरिब म्हणजे यासाठी काय नियम आहेत...? पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी या ऑडिओत काय म्हटलंय पाहुयात...

माझ्या प्रिय देशवासियांनो, आनंदाची बातमी 26 जानेवारीपासून सरकार गरिबांना 2 हजार रुपये मदत देणार आहे. याबाबत सरकारमधील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली...तसंच ऑफिशीयल वेबसाईटही पडताळून पाहिल्या...

गरिबांना 2 हजार देण्याची केंद्राची योजना नाही

पंतप्रधान मोदींनीही योजनेची घोषणा केलेली नाही

मोदींच्या आवाज AIच्या माध्यमातून तयार केला

लोकांना विश्वास बसावा म्हणून ऑडिओ व्हायरल

अशी कोणतीही योजना केंद्र सरकारची नाही...पैसे देण्याचं आमिष दाखवून गरिबांची फसवणूक करण्याचा हा डाव आहे...त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कुणालाही पैसे देऊ नका...आमच्या पडताळणीत केंद्र सरकार गरिबांना 2 हजार रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

WPLमध्ये घडला इतिहास; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं ५७ चेंडूत ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT