A viral post falsely claims that Prime Minister Narendra Modi announced a one-year free mobile recharge plan — but the fact check reveals the claim is completely fake. Saam Tv
व्हायरल न्यूज

Free Mobile Recharge Plan for One Year: मोदींकडून वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज? 1 GB डेटाही क्षुल्लक किंमतीत मिळणार?

Fact Check: एक वर्षांसाठी आता सर्वांना मोबाईल रिचार्ज फ्री मिळणार आहे...हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...पण, होय असा दावा करण्यात आलाय...वर्षभर फ्री मोबाईल रिचार्जची योजना असल्याचा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी केली.

Sandeep Chavan

मोदींचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...आता 1 जीबी डेटा हा चहाच्या एका कपाच्या किंमती पेक्षाही महाग होणार नसल्याचा दावा करण्यात आलाय...इतकंच नव्हे तर सोबत एक मेसेजही व्हायरल होतोय...त्यामध्ये दावा करण्यात आलाय की मोदी देशवासियांसाठी वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज योजना आणलीय...पण, खरंच अशी योजना आहे का...?

...मोदींचा व्हिडिओ आणि त्यांच्या नावाने मेसेज व्हायरल होत असल्याने यावर अनेकांचा विश्वास बसलाय...खरंच केंद्र सरकारची अशी योजना आहे का...? ही योजना असेल तर लाभासाठी काय करावं लागेल...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली..पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्री रिचार्ज योजनेच्या अंतर्गत सर्व मोबाईल धारकांना एक वर्षासाठी रिचार्ज सेवा मिळणार आहे

या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकते...त्यामुळे आमच्या टीमने अशी योजना आहे का...? याची माहिती मिळवली..

पंतप्रधान मोदींची फ्री मोबाईल रिचार्ज योजना नाही

फ्री मोबाईल रिचार्जचा दावा खोटा

एक वर्षासाठी रिचार्ज सेवा मोफतचा प्लान नाही

मोदी बिहारच्या निवडणुकीत बोलले होते...1 जीबी डेटा हा चाय पेक्षाही महाग होणार नाही असं म्हणाले होते...मात्र, कुठेही फ्री मोबाईल रिचार्ज मिळेल असा दावा कुठेही केलेला नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत पंतप्रधान मोदींची फ्री मोबाईल रिचार्ज योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak: प्रिया मराठेनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार 'अ परफेक्ट मर्डर' नाटकात मुख्य भूमिका

वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर! १० जणांचा मृत्यू

Beauty Tips: Eyebrowचे केस अचानक गळतायेत अन् बारिक दिसतायेत? मग या टिप्स नका करा फॉलो

Nutrition Tips: डोक्यात वाईट विचार का येतात? या' व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आरोग्यावर होतो परिणाम

Jay Bhanushali-Mahhi Vij : घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने मौन सोडलं, VIDEO शेअर करून सर्व सांगितलं

SCROLL FOR NEXT