gas shortage viral news  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार? मोबाईलमधील इंटरनेटही चालणार नाही?

viral news : गॅस टंचाईमुळे आता मोबाईलही बंद होणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

Sandeep Chavan

युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे आता मोबाईलही बंद होणार असा दावा केल्यानं खळबळ उडालीय. एकवेळ जेवण नसेल तरी चालेल, मात्र मोबाईल हवा अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे खरंच गॅस टंचाईचा फटका आता मोबाईललाही बसणार आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण, मेसेज काय व्हायरल होतोय तेही पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय?

LPG पुरवठा बंद झाल्याने मोबाईलचे नेटवर्क गायब होण्याची भीती व्यक्त होतेय. फोनमधील सिग्नल गायब होऊन डेटा आणि कॉलिंग बंद होण्याची शक्यता आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. कारण, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने टॉवर तयार करणाऱ्या कंपन्यांचा गॅस पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिलेयत. पण, खरंच मोबाईल नेटवर्क आणि गॅसचा काय संबंध आहे? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत एक्सपर्टच अधिक माहिती देऊ शकतात...आमच्या प्रतिनिधींनी एक्सपर्टकडून माहिती घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार नाही

मोबाईल टॉवरसाठी गॅल्वेनायजेशन प्रक्रिया महत्त्वाची

गॅल्वेनायजेशन प्रक्रियेसाठी LPG चा वापर करावा लागतो

प्रक्रिया टॉवरला गंजमुक्त ठेवण्यासाठी उपयोगी पडते

टॉवर गंजण्यापासून वाचवण्यासाठी झिंकचा संरक्षक थर चढवतात

ही प्रक्रिया करण्यासाठी उच्च तापमानाची गरज असते, जे LPG च्या साहाय्याने मिळवली जाते. त्याचा थेट मोबाईलवर परिणाम होत नाही. नेटवर्क आणि डेटा यावर काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

राज्यात शेतकरी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू; काय आहेत योजनेचे नियम-अटी?

लग्नाच्या रात्री नवरदेवासह ५ मित्र खोलीत गेले; नवरीला दारु पाजली, ओलांडल्या सर्व मर्यादा; नेमकं काय घडलं?

Crime: दीड वर्षे महिलेवर बलात्कार, ३ वेळा गर्भपात; प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले

SCROLL FOR NEXT