Whatsapp  Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

whatsapp viral fact check : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना सावध राहण्याची गरज आहे. कारण मोबाईलमध्ये आलेल्या लिंकमुळे तुमचं व्हॉट्सअॅप हॅक करू शकतो असा दावा करण्यात आलाय.

Sandeep Chavan

तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर सावध व्हा...कारण, तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय...तुमच्या मोबाईलमध्ये आलेली लिंक व्हॉट्सअॅप हॅक करू शकतो असा दावा करण्यात आलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

...तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय...होय, कारण तुमच्या मोबाईलमध्ये आलेली लिंक तुमच्या डेटाची चोरी करतेय असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच नकळत तुमच्या व्हॉट्सअॅपची चोरी करतंय का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

सिम कार्डशिवाय तुमचे संपूर्ण व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होऊ शकते. ओळखीच्या व्यक्तीकडून 'हा फोटो बघ' असा मेसेज येतो. फेसबुकसारखी दिसणारी बनावट लिंक पाठवून फसवणूक केली जाते.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, प्रत्येकजण सध्या व्हॉट्सअॅप वापरतो...दिवसाला हजारो मेसेज येत असतात...त्यात एखादा मेसेज हॅकर्सचाही असू शकतो...त्यामुळे हॅकर्सचा मेसेज आला तर कसं ओळखायचं...? पण, त्याआधी महत्त्वाचं म्हणजे खरंच व्हॉट्सअॅप हॅक होतंय का...? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन

हॅकर्सने एक नवीन लिंक तयार केलीय

तुम्ही लिंक उघडून पाहाल अशी लिंक पाठवली जाते

व्हॉट्सअॅप चालू असल्याने त्याचा अक्सेस जातो

तुमच व्हॉट्सअॅप समोरच्या हॅकरकडे अॅक्टिव्ह होतं

हॅकर इतरांना मेसेजही पाठवू शकतो

हॅकर्सपासून वाचायचं कसं हे सर्वात महत्त्वाचं आहे...

CERT-In ने ही काही उपाय सुचवलेयत...पाहुयात...

हॅकर्सपासून सावधगिरी बाळगा

संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा

अनोळखी डिव्हाइस दिसताच लॉग आऊट करा

व्हॉट्स अॅपवर 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' सुरू ठेवा

त्यामुळे तुम्हीही ही काळजी घ्या...आमच्या पडताळणीत तुमचं व्हॉट्सअॅप हॅकर्सकडून हॅक होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Municipal Elections Voting Live updates : पुणे महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT