Post Office Scam  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Post Office Scam : पोस्टाकडून पती-पत्नीसाठी दरमहा 36 हजार कमावण्यासाठी संधी आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...त्यासाठी एक लिंकही देण्यात आलीय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

पोस्ट ऑफिसची आता पती आणि पत्नीसाठी बंपर ऑफर असल्याचा दावा करण्यात आलाय...योजनेअंतर्गत पती-पत्नी महिन्याला 36 हजार रुपये कमवू शकतात असा दावा केलाय...त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की या ऑफरचा लाभ घ्यायचा कसा...? काहींनी तर पोस्टात जाऊन विचारपूस केली...मात्र, काहींनी या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे अॅपवरून फॉर्म मिळवलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज म्हटलंय की, पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत पती-पत्नी दरमहा 36 हजार रुपये कमवू शकतात. मोबाईल से लोन नावाच्या वेबसाईटला भेट द्या आणि फायदे मिळविण्यासाठी फॉर्म भरा'

पोस्ट हे प्रत्येक गावात असतं. त्यामुळे याची सत्यता काय आहे हे सांगण्यासाठी आमच्या टीमने पोस्टातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि माहिती मिळवली. त्यावेळी त्यांनी अशी योजनाच नसल्याचं सांगितलं. मग, या मेसेजसोबत दिलेली लिंक कुणाची आहे, याची पडताळणीत केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयातv

व्हायरल सत्य काय?

पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी 36 हजारांची योजना नाही

मोबाईल से लोन नावाची वेबसाईट बनावट

पैशांचं आमिष दाखवून हॅकर्स लिंक शेअर करतात

कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नका

लिंकवर क्लिक केल्याने डेटा चोरी होऊ शकतो

मोबाईल पे लोन ही वेबसाइट सप्टेंबर 2023 साली आयर्लंडमध्ये तयार करण्यात आली...त्यामुळे तुम्हाला जर अशी कुणी लिंक पाठवली तर चांगली ऑफर म्हणून उघडून पाहू नका...हॅकर्सचा हा डाव असू शकतो...त्यामुळे आमच्या पडताळणीत पोस्टात पती-पत्नीसाठी दरमहा 36 हजार रुपयांची योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKycला अडचण; पती आणि वडील हयात नसल्यावर काय करावे? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Live News Update: जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍यपदासाठी आज आरक्षण सोडत

Chole Recipe : सणासुदीला अचानक घरी पाहुणे आले? झटपट बनवा पंजाबी स्टाइल छोले, वाचा रेसिपी

Amruta Malwadkar : लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; नवऱ्याचे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शी आहे खास कनेक्शन, पाहा PHOTOS

Diwali 2025: दिवाळीपूर्वी जर 'ही' स्वप्न दिसली तर समजा घरी बसणार आहे लक्ष्मीची कृपा; तुम्ही व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT