A viral message claims keeping more than ₹20,000 cash at home can attract penalty. Sam TV investigates the truth behind the claim. Saam Tv
व्हायरल न्यूज

20 हजारांची कॅश ठेवाल तर शिक्षा? कॅश सापडल्यास 100% दंड भरावा लागेल?

Fact Check: तुम्ही 20 हजार पेक्षा जास्त कॅश घरात ठेवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते...ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, असा दावा करण्यात आलाय...याची आम्ही पडताळणी केली..

Sandeep Chavan

तुम्ही घरामध्ये किंवा कुणाला 20 हजार पेक्षा जास्त रक्कम देत असाल तर दुप्पट म्हणजे 100 टक्के दंड भरावा लागणार आहे...होय, असा दावा करण्यात आलाय...तुम्ही 20 हजारांची रोकड कुठून आणली...? एवढे पैसे कशासाठी आणले...? याचं जर उत्तर तुम्हाला देता आलं नाही...त्या व्यवहाराचे कागदपत्र नसतील तर कारवाई होऊ शकते असा दावा केलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? कारण, सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा हा विषय आहे...बरेच जण घरात 20 हजारांपेक्षा कॅश ठेवतात...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...

जर तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास अडचणीत येऊ शकता. आयकर कायदा, 1961 च्या कलम 271डीनुसार कारवाई होऊ शकते.दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. हा मेसेज व्हायरल होतोय...याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...याबाबत एक्सपर्ट सोप्या भाषेत माहिती देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी सीएंना भेटले...आणि त्यांना व्हायरल मेसेज दाखवून खरंच घरात 20 हजारांपेक्षा जास्त कॅश असेल तर आयकर विभाग दंड ठोकू शकतं का...? याबद्दल माहिती जाणून घेतली..

20 हजारांहून अधिक पैसे घरी ठेवल्यास कारवाई होऊ शकते

आयकर कायद्यातील कलम 271D मध्ये कारवाईचा उल्लेख

व्यवहाराचे कागदपत्र नसल्यास 100% दंड आकारला जाईल

छोटे व्यापारी नेहमी कर्ज घेतात देतात त्यांना सूट

बँक, UPI, पोस्ट ऑफिसमधील व्यवहार सुरक्षित

त्यामुळे तुम्हाला आता पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे...पैसे कसे आले हे सिद्ध न केल्यास देणाऱ्या आणि घेणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते...या नियमात शेतीतून उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना सूट देण्यात आलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता 20 हजारांपेक्षा जास्त कॅश ठेवाल तर शिक्षा होणार असल्याचा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

Maharashtra Live News Update : किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप

BMC Mayor: मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

Single Strip Blouse Designs: ब्लाऊजची फक्त एकच पट्टी, साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे 5 स्टायलिश पॅटर्न

SCROLL FOR NEXT