Fact Check update Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : म्हशीनं पाजलं बिबट्यांना दूध? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Fact Check update : बिबट्यांची राज्यभरात दहशत सुरू असताना जुन्नरमध्ये म्हशीने बिबट्यांना दूध पाजल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...? बिबट्याला म्हशीनं दूध पाजलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही...पण, हे 3 बिबटे थेट गोठ्यात शिरून म्हशीचं दूध पिताना दिसतायत...बघा, ही म्हैस शांतपणे उभी असलेली दिसतेय आणि तिघे बिबटे दूध पितायत...पण, व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...? व्हिडिओ कुणी बनवला...? बिबट्याला दूध पाजताना म्हशीला जीवाची भीती वाटली नाही का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...v

बिबट्यांना म्हैस दूध पाजत असल्याचा हा व्हिडिओ जुन्नरमधील असल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय...कारण, बिबट्या हा प्राण्यांवर, माणसांवरही हल्ला करतोय...मात्र, या व्हिडिओत तो म्हशीचं दूध पिताना दिसतोय...त्यामुळे खरंच हा बिबट्या जुन्नरमध्ये दिसलाय का...? बिबट्यांना म्हशीनं दूध पाजलंय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...व्हिडिओ निरखून पाहिला...तसंच वनअधिकाऱ्यांशीही संपर्क साधला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

म्हशीने बिबट्यांना दूध पाजलेलं नाही

बिबट्यांचा व्हिडिओ जुन्नरमधील नाही

व्हायरल व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवलाय

...असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जाते...मात्र, हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवून दिशाभूल करण्यात आली...आम्ही याची पडताळणी केली असता जुन्नरमध्ये म्हशीने बिबट्यांना दूध पाजल्याचा दावा असत्य ठरलाय...त्यामुळे असे व्हिडिओ पाहून तुम्ही विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

SCROLL FOR NEXT