Viral message claiming ₹46,000 government aid is fake; Finance Ministry and PIB confirm no such scheme exists. Saam Tv
व्हायरल न्यूज

सरकार गरिबांना देणार 46 हजार रुपये? अर्थमंत्रालय गरिबांना आर्थिक मदत देणार?

Fact Check: सरकार आता गरिबांना 46 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

.केंद्र सरकार आता गरिबांना 46 हजारांची मदत करणार आहे असा दावा केल्याने सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय की हे पैसे मिळणार कसे...? गरिबांसाठी आर्थिक मदत म्हणून अर्थ मंत्रालय मदत देत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय...कारण, सरकार हे गरिबांना पैसे देत असल्याने अनेकांना प्रश्न पडलाय की पैसे कसे मिळवायचे...? त्यामुळे आम्ही या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...यामेसेजसोबत लिंकही देण्यात आलीय...त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला...खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? मेसेजसोबतच्या लिंकवर माहिती भरल्यावर पैसे मिळणार का...? याची माहिती घेतली...त्यावेळी आम्हाला PIB कडूनही माहिती मिळाली...

अर्थ मंत्रालयाने कोणतीही योजना जाहीर केलेली नाही

सरकारच्या नावाने व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

मेसेजसोबतच्या लिंकवर क्लिक करू नका

पैशांचं आमिष दाखवून फसवणुकीचा डाव

दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा

पैसे देण्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं जातं...त्यामुळे तुम्हाला असे मेसेज आले तर कोणत्याही लिंकवर जाऊन माहिती भरू नका...तुमची फसवणूक होऊ शकते...आमच्या पडताळणीत सरकार गरिबांना 46 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीची पुणे पोलिस आयुक्तलयात EOWकडून चौकशी

Karan Johar: 'देवा, मला एक जोडीदार...'; ५३ वर्षीय करण जोहर शोधतोय पार्टनर, अचानक काय झालं? स्वत:च सांगितलं कारण

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; सलील देशमुख यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT