gold  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : आरबीआयने विकलं १२ अब्ज डॉलर सोनं? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य?

viral news : आरबीआयने १२ अब्ज डॉलर सोनं विकल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे.

Vishal Gangurde

भारताच्या सोन्याचा साठ्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे

आरबीआयने १२ अब्ज डॉलर विकल्याचं खोटे वृत्त सोशल मीडियावर व्हायल

सोन्याच्या साठ्याबाबत सरकारने दिलं स्पष्टीकरण

भारतात परकीय चलन साठा आणि सोन्याच्या साठ्यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी आरबीआयने १२ अब्ज डोलरचं सोने विकल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु सोशल मीडियावरील दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही सरकारने आवाहन केलं आहे.

सरकारची फॅक्ट एजन्सी असलेल्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'ने सोशल मीडियाने 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, आरबीआयच्या सोन्याच्या साठा कमी होत नसून वाढत आहे. भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये सोन्याचा साठ्याचा वाटा हा १३.९२ टक्के इतका होता. पुढे ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढून १६.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २२ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा १६.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

कसा झाला वाद सुरू?

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार आरबीआयने जवळपास १२ अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु सोशल मीडियावर ही खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली. यावर आता PIB ने भाष्य केलं. PIB ने आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीचा संदर्भ देत कोणतीही विक्री झाली नसल्याचा दावा केला आहे.

आरबीआयजवळ किती सोने आहे?

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून एकूण ८८०.५२ मॅट्रिक टन सोने आहे. यातील ३१२.३२ मॅट्रिक टन सोने हे इश्यू डिपार्टमेंटमध्ये असेट म्हणून ठेवलं आहे. तर ५६८.२० मॅट्रिक सोने हे बँकिग डिपार्टमेंटकडे ठेवण्यात आलं आहे. भारताच्या सोन्याच्या साठ्यात कोणतीही घसरण झालेली नाही.

सोन्याचे मूल्य का वाढलं?

आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, काही महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळाली होती. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यानंतरही आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याच्या एकूण मूल्यात वाढ होताना दिसत आहे. यामुळे भारतात सोन्याचा साठा आधीपेक्षा मजबूत होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; पाच दिवसात ७८ दारू अड्ड्यांवर छापे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जातून सुटकेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, हत्या करून कारमध्ये मृतदेह पेटवला

देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

डायबिटीजमध्ये नारळ पाणी पिऊ शकता का? नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते की कमी होते? जाणून घ्या

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, आंदोलनापूर्वी ३ प्रवक्त्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT