viral news  Saam tv
व्हायरल न्यूज

दारू पिण्यासाठी बायकोची परवानगी न घेतल्यास नवऱ्याला जेल? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Fact check : व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही सत्यता पडताळून सांगतो...तुमची दिशाभूल होऊ नये म्हणून आम्ही शहानिशा करून तुमच्यासमोर सत्यता आणतो...असाच एक दावा करण्यात आलाय की दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी घ्यावी लागेल...नाहीतर जेलही होऊ शकते...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

..हा व्हिडिओ ऐकलात...आता दारू पिणाऱ्यांना पत्नीची परवानगी घ्यावी लागणार आहे...पत्नीची परवानगी न घेता पती दारू पिऊन घरी आला आणि पत्नीने तक्रार केली तर जेल होऊ शकते...होय, असाच दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...त्यामुळे आता दारू पिणाऱ्या पतींची काही खैर नाही...पण, खरंच असा कायदा बनवण्यात आलाय का...?

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, खरंच दारू पिणाऱ्यांसाठी कायदा बनवण्यात आलाय का...? फक्त दारू पिणाऱ्या पतींसाठीच हा कायदा आहे का...? दारू पिणाऱ्या पत्नींसाठी असा कायदा नाही का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...कारण, काहीजण कायद्याचा गैरफायदाही घेतात...त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे...असा कायदा आहे का...? याची इत्यंभूत माहिती कायदेतज्ज्ञांकडून मिळू शकते...त्यामुळे आम्ही याची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी बंधनकारक नाही

BNS कलमात याबद्दल कुठलंही धोरण आखलेलं नाही

पती, पतीच्या नातेवाईकांकडून पत्नीवर होणाऱ्या क्रूरतेबद्दल कलम

पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला शिक्षा होऊ शकते

या व्हिडिओत खोडसाळपणा करण्यात आलाय...BNS च्या कलम 85B नुसार पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर कारवाई होऊ शकते...मात्र, दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी न घेतल्यास जेल होऊ शकते हा दावा असत्य ठरलाय...या दाव्याची पडताळणी करण्याचा हेतू दारू पिणाऱ्यांचं समर्थन म्हणून नाही...तर सत्यता पडताळणीसाठी केलाय...साम टीव्ही दारू पिणाऱ्यांचं समर्थन करत नाही...कारण, दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलीयत...त्यामुळे दारूपासून तुम्हीही लांब राहा असं आवाहन आम्ही करतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : घराला कुलूप लावून आईकडे गेली, चोराने 43 तोळं सोन्यावर डल्ला मारला; कोल्हापुरात जबराट चोरी

Maharashtra Live News Update: दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली

रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

Protein shake cancer risk: वर्कआउटसाठी घेत असलेला प्रोटीन शेक ठरतोय जीवघेणा? कॅन्सरचा धोका असल्याचा तज्ज्ञांकडून खुलासा

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT