Viral health news fact check Saam
व्हायरल न्यूज

Fact Check: रसगुल्ला खाल्ल्याने अर्धांगवायूचा झटका? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Can sweets cause paralysis : रसगुल्ला खाल्ल्याने पॅरालिसिस होतो हा व्हायरल दावा चुकीचा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र जास्त गोड खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

Sandeep Chavan

Viral health news fact check : व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत...आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता दावा करण्यात आलाय की एका व्यक्तीने रसगुल्ला खाल्ल्याने त्याला पॅरालिसिस झाला...पण, खरंच रसगुल्ला खाल्ल्याने पॅरालिसिस येऊ शकतो का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

तुम्ही रसगुल्ला आवडीने खात तर सावध व्हा...कारण, रसगुल्ला खाल्ल्याने एका व्यक्तीला पॅरालिसिस झालाय...अचानक सर्व अवयव काम करणं बंद झाले...पण, खरंच रसगुल्ला खाल्ल्याने या व्यक्तीला पॅरालिसिस आलाय का...? रसगुल्ला अनेकजण आवडीने खातात...पण, खरंच रसगुल्ल्यामुळेच त्या व्यक्तीला पॅरालिसिस झालाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

हैदराबादमधील एका व्यक्तीला रसगुल्ला खाणं महागात पडलंय. रसगुल्ला खाल्ल्याने पॅरालिसिस झाला.35 वर्षीय व्यक्तीने 6 रसगुल्ले खाल्ले.त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील काही अवयव काम करणं बंद झाले.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही अधिक माहिती मिळवली असता एका व्यक्तीला रसगुल्ला खाल्ल्यानंतर पॅरालिसिस आल्याची माहिती मिळाली...पण, खरंच असं होऊ शकतं का...? कारण, लहानग्यांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळेच रसगुल्ला खातात...त्यामुळे आमच्या टीमने तज्ज्ञांकडून याबाबत अधिक माहिती मिळवली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

रसगुल्ला खाल्ल्याने अर्धांगवायूचा झटका येत नाही

रसगुल्ला अति प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो

रक्तातील साखरेची पातळी वाढते, इन्सुलीन तयार होतं

तब्येतीच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो

रसगुल्ला हा गोड पदार्थ आहे...त्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो...पण, रसगुल्ला खाल्ल्याने पॅरालिसिस होतो हा दावा असत्य ठरलाय...तरीदेखील तुम्ही आवडीने रसगुल्ला खात असाल आणि तुम्हाला आधीच काही आजार असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या...

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

No PUC NO Fuel : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! PUC नसेल तर पेट्रोल- डिझेल मिळणार नाही; कुठे लागू केला आहे निणर्य? वाचा

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

Famous Actress Death : "शिवा मला तुझ्यासोबत घेऊन जा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT