English Professor Selling Momos Saam TV
व्हायरल न्यूज

English Professor Selling Momos: फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज; व्हायरल VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही खाण्याचा मोह

Video Viral English Professor Selling Momos: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी विविध पद्धतीने आपल्या वस्तू विकतात.

Ruchika Jadhav

Video Viral:

मोमोज हे एक असं स्ट्रीटफूड आहे जे प्रत्येकालाच आवडतं. गेल्या दोन वर्षांत मोमोजने नागरिकांना वेड लावलं आहे. खवय्ये चमचमीत आणि टेस्टी मोमोजला जास्त पसंती देत आहेत. इतर स्ट्रीटफूड आरोग्यासाठी हाणीकार ठरतात त्यामुळे खवय्ये उकडलेले मोमोज खाण्याकडे वळले आहेत. हेच मोमोज फाडफाड इंग्लीश बोलत विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी विविध पद्धतीने आपल्या वस्तू विकतात. अशात रस्त्यावर छोटा स्टॉल लावून एक व्यक्ती मोमोज विकत आहे. मोमोज विकताना हा व्यक्ती आपल्या ग्राहकांना हिंदीमध्ये नाही तर इंग्रजी भाषेत बोलून माहिती देत आहे. सदर व्यक्ती एक इंग्रजीचे शिक्षक आहेत. नोकरी आणि बेरोजगारीमुळे त्यांनी अशा पद्धतीने मोमोज विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

कुठे आहेत इंग्रजी मोमोजवाले काका?

मोमोजचा हा स्टॉल लखनऊमधला आहे. हे काका रोज सायंकाळी ४ ते ६ यावेळेत चटोरी गलीमध्ये मोमोजचा स्टॉल लावतात. यावर एक छोटा गॅस, स्टीमर, मोमोज आणि चटण्या ठेवण्यात आल्यात. आपण घरच्याघरी टेस्टी मोमोज अगदी स्वच्छपणे बनवतो, असं हे काका इंग्लीशमधून आपल्या ग्राहकांना सांगत आहेत.

मोमोजची किंमती किती?

इंग्रजीचे प्रोफेसर असलेल्या या सरांकडे विविध प्रकारचे मोमोज मिळतात. वेज आणि नॉनवेजमध्ये देखील वेगवेगळ्या वरायटी देण्यात आल्या आहेत. त्यांच्या एक प्लेट मोमोजची किंमत १०० रुपये इतकी आहे. यामध्ये मोमोजचे १० पीस आहेत.

त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५६ लाख व्ह्यूव्ज आलेत. तर २ लाखांहून अधिक व्यक्तींनी व्हिडीओ लाइक केला आहे. या काकांचे मोमोज केवळ २ तासांमध्ये संपतात. त्यांच्या स्टॉलवर खवय्यांची नेहमीच गदी पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

Super Seeds: केस गळणे, कोंडा आणि मुरुमांमुळे वैतागलात? मग या ५ बियांचे फायदे वाचाच

Harshvardhan Rane: 'मी माझ्या वडिलांना ५-६ पार्टनरसोबत…”; मराठमोळा अभिनेता हर्षवर्धन राणेचा धक्कादायक खुलासा

Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

SCROLL FOR NEXT