Ulhasnagar Dahi Handi Viral Video: आरारा खतरनाक!थरांची काय गरज; भावाने दोरीला लटकून डोक्याने फोडली ९ थरांची हंडी

Man Broke Dahi Handi By Hanging On Rope: एका व्यक्तीने थर न लावताच आगळ्या वेगळ्या पध्दतीने दहीहंडी फोडली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
Man Broke Dahi Handi By Hanging On Rope
Man Broke Dahi Handi By Hanging On Ropesaam tv
Published On

Dahi Handi Viral Video Of Ulhasnagar:

दहीहंडी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सन आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी दहीहंडी हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी गोविंदा पथकं हजारोंच्या संख्येने दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात.

एकावर एक ८,९ थर लावून गोविंदा पथके दहीहंडी फोडत असतात. सर्वात वरच्या थराला असलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळत असतो.

मात्र दहीहंडीपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात एका व्यक्तीने थर न लावताच आगळ्या वेगळ्या पध्दतीने दहीहंडी फोडली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Man Broke Dahi Handi By Hanging On Rope
IND VS IRE 3rd T20I, Playing XI : टीम इंडियात होणार ३ मोठे बदल! अशी असेल प्लेइंग ११ आणि कोण जिंकणार?

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ उल्हासनगर शहरातील नेताजी चौक परिसरातील असल्याचं म्हटलं जात आहे. तर झाले असे की, नेताजी चौक परीसरात २०२२ मध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक गोविंदा पथकांनी येऊन सलामी दिली. शेवटी दहीहंडी फोडण्याची वेळ आली. दहीहंडी फोडणारा पथक थर लावणार इतक्यात असं काही घडलं ज्याचा कोणी विचारच केला नव्हता. (Viral Video)

तर झाले असे की, दहीहंडी फोडणारा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होत होता.त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती टॉवरच्या साहाय्याने वर गेला आणि दोरीला पकडून तो हंडीपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याने डोक्यानेच हंडी फोडली.

या आगळ्या वेगळ्या दहीहंडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. असं कृत्य करणं त्या अज्ञात व्यक्तीला चांगलच भोवलं होतं. कारण त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Disclaimer: असं कृत्य करणं जिवघेणं ठरू शकतं त्यामुळे असं काही करू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com