IND VS IRE 3rd T20I, Playing XI : टीम इंडियात होणार ३ मोठे बदल! अशी असेल प्लेइंग ११ आणि कोण जिंकणार?

India vs Ireland Playing 11 Prediction: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बुधवारी आयर्लंडचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
team india
team indiasaam tv
Published On

India vs Ireland 3rd T20I Match Prediction And Playing 11:

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बुधवारी (२३ ऑगस्ट) टी-२० मालिकेत आयर्लंडचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मालिकेतील तिसरा टी -२० सामना डब्लिनच्या द विलेजमध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

team india
Cricketers Death: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! IPL स्पर्धा सुरू असतानाच दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास..

एकीकडे भारतीय संघ ३-० ने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे आयर्लंडचा संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

संधीच्या शोधात असलेल्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. तर सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयर्लंड संघातून बाहेर केलं जाऊ शकतं.

भारतीय संघात होऊ शकतात ३ बदल..

तिसऱ्या आणि अंतिम टी -२० सामन्यासाठी भारतीय संघात जितेश शर्माला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याला संजू सॅमसनच्या जागी संधी दिली जाऊ शकते. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमद खेळताना दिसून येऊ शकतो.

तसेच वेगवान गोलंदाजी आक्रमणात देखील मोठा बदल पाहायला मिळू शकतो. अर्शदिप सिंग किंवा प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती देऊन मुकेश कुमारला संघात स्थान दिले जाऊ शकते.

मॅच प्रेडिक्शन

भारतीय संघाने सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात आयर्लंडचा संघ कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. मात्र आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. (Latest sports udpates)

team india
Asia Cup 2023: राहुल, अय्यर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर खेळणार 'हा' फलंदाज; कर्णधार रोहितने केला मोठा खुलासा

भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११- यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मुकेश कुमार.

आयर्लंड संघाची संभावित प्लेइंग ११- रॉस अडायर, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (यष्टिरक्षक), कर्टिस कॅंपर, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मैक्कार्थी, क्रेग यंग, थियो वॅन वोर्कोम आणि बेंजामिन व्हाइट.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com