व्हायरल न्यूज

Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक लॅब्राडोर कुत्रा त्याच्या मालकासह आकाशात विहार करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dog paragliding with owner:  पॅराग्लायडिंग असो किंवा रिव्हर राफ्टिंग, प्रत्येकाला अशा साहसांचा आनंद घ्यायचा असतो. अनेकांच्या 'बकेट लिस्ट'मध्ये ते असते. अनेकांना निसर्गाचा हा उद्भूत नजारा आकाशातून पाहाण्याचा आनंद मोहित करतो. आता असाच आनंद एक कुत्रा देखील अनुभवत असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटले, कारण या व्हिडिओमध्ये एक कुत्रा अतिशय आरामात पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. कुत्रा मालकाच्या मांडीवर बसून पॅराग्लायडिंगच्या मदतीने आकाशात झेप घेतली आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कुत्र्याने केले पॅराग्लायडिंग 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लॅब्राडोर कुत्रा त्याच्या मालकासह आकाशात विहार करताना दिसत आहे. हा हवाई सफर कोणत्याही विमानाने नाही तर पॅराग्लायडिंगने केला जात आहे. होय, पॅराग्लायडिंग करताना हा कुत्रा शांत बसून चेहऱ्यावर वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा आनंद घेत आहे. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना विविध गोष्टी करायला लावतात, परंतु तुम्ही क्वचितच कोणी कुत्र्यासोबत पॅराग्लायडिंग करताना पाहिले असेल. अशी दृश्ये खरोखरच क्वचितच पाहायला मिळतात.

यापूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता

याआधी तीन वर्षांच्या कुत्र्याचा पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ओका नावाचा कुत्रा त्याच्या मालक शम्ससोबत पॅराग्लायडिंग करताना दिसत होता. शम्सने हा कुत्रा पाळला होता आणि तीन महिन्यांनंतर त्याला या कुत्र्यासोबत आकाशात फेरफटका मारायचा होता. शम्स हा व्यवसायाने साहसी चित्रपट निर्माता आहे आणि दररोज सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करत असतो. हा व्हिडिओ शम्सने 2021 मध्ये शेअर केला होता.

यापूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता

याआधी तीन वर्षांच्या कुत्र्याचा पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ओका नावाचा कुत्रा त्याच्या मालक शम्ससोबत पॅराग्लायडिंग करताना दिसत होता. शम्सने हा कुत्रा पाळला होता आणि तीन महिन्यांनंतर त्याला या कुत्र्यासोबत आकाशात फेरफटका मारायचा होता. शम्स हा व्यवसायाने साहसी चित्रपट निर्माता आहे आणि दररोज सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करत असतो. हा व्हिडिओ शम्सने 2021 मध्ये शेअर केला होता.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT