Veg Momos Recipe Saam Tv
व्हायरल न्यूज

Side Effects of Momos: मोमोज खाल्लाने मूळव्याध आणि कॅन्सर होतो? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? पाहा व्हिडिओ

Really Momos cause cancer? मोमोज, मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ अलिकडे तरूणाईत भलताच लोकप्रिय झालाय. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात मोमोज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला माहितीय का, तुम्ही खात असलेले मोमोज भलेही स्टीम केलेलं असेल मात्र ते आरोग्यासाठी हानीकारक आहे. मोमोजमुळे आजारांचा धोका असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडतळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा...

Vinod Patil

मुंबई : फास्ट फूडच्या जमान्यात प्रत्येकालाच काहीतरी वेगळं आणि चटकदार हवं असतं. पिझ्झा-बर्गरच्या काळात एक पदार्थ प्रचंड लोकप्रिय झालाय तो म्हणजे मोमोज... जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तरूणाईत मोमोजची मागणी खूपच वाढलीय. मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ स्टीम केलेला म्हणजेच वाफवलेला असतो त्यामुळे आपण ऑईली पदार्थ खात नाही हीच तरूणाईची भावना असते. मात्र याच मोमोजबाबत एक खळबळजनक मेसेज व्हायरल होतोय. त्यात मोमोज खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं म्हंटलंय. व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय. पाहा..

तुम्ही जर मोमोजचे शौकिन असाल तर वेळीच सावध व्हा, मोमोज खाल्ल्यानं तुम्हाला गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो, असा मेसेज व्हायरल होत आहे.

मोमोज तर सारेच जण खातात. ऑईली खाणं नको म्हणून तरूणी मोमोजला पहिली पसंती देतात. त्यामुळे व्हायरल मेसेज खरा आहे का ? आम्ही याची पडताळणी केली. मोमोज कोणत्या पदार्थांपासून तयार होतात याची माहिती घेतली.आमच्या इन्व्हेस्टिगेशनमधून काय समोर आलं पाहा.

मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. खूप जास्त प्रमाणात मैदा खाणं आरोग्यासाठी हानीकारक आहे. मोमोज चवदार बनावेत यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजेच MSGचा वापर केला जातो. हे केमिकल कपांऊंड तुमच्या शरीराला नुकसान पोहचवू शकतं. याशिवाय काही मोमोजमध्ये क्लोरिन गॅस आणि बेंजॉईल पॅरॉक्साईडचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमची शुगर वाढू शकते. मोमोजच्या चटणीत सोडियमचं प्रमाण अधिक असतं. एका सर्व्हेनुसार 5 पैकी 3 व्यक्ती 15 दिवसांत किमान दोन वेळा स्ट्रीट फूड खातात.

मोमोज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमधून मोमोज आरोग्यासाठी किती हानीकारक आहेत हे स्पष्ट झालं. व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत अधिक माहिती आरोग्य तज्ज्ञ देऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडूनही सत्य जाणून घेतलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं.

जास्त प्रमाणात मोमोज खाल्ल्यानं गंभीर आजार उदभवू शकतात. कलरमिश्रित आणि तिखट मोमोज असतील तर शरीरातील हाडं कमकुवत होऊ शकतात. तसंच मूळव्याधीचीही समस्या उदभवू शकते. मात्र मोमोजमुळे कॅन्सर होतो असं संशोधनातूत स्पष्ट झालेलं नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणंय.

आमच्या पडताळणीत सातत्यानं मोमोज खाल्ल्यानं गंभीर आजार होत असल्याचा दावा सत्य ठरलाय. अर्थात सगळेच दुकानदार मोमोज बनवण्यासाठी घातक पदार्थांचा वापर करतातच असं नाही. ज्या मोमोजमध्ये भेसळ नसते अशा मोमोजचा रंग काहीसा पिवळसर असतो. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन मोमोज किती प्रमाणात खावेत, भेसळ कशी ओळखावी याची खूणगाठ बांधून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

SCROLL FOR NEXT