DIWALI SALE FRAUD ALERT saam tv
व्हायरल न्यूज

स्वस्तातील ऑनलाईन सेल, अकाऊंट रिकामं करेल? ऑफर्सच्या लिंकवर क्लिक करताय? सावधान!

Online Shopping Scam:आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... तुमच्या मोबाईलवर दिवाळी ऑफर्सची लिंक आली असेल तर सावध व्हा...कारण, तुम्ही लिंक उघडून पाहिली तर तुमचं अकाऊंट खाली होऊ शकतं...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

Sandeep Chavan

दिवाळी सेलच्या नावाखाली तुम्हाला जर लिंक्स आली असेल तर सावध व्हा...कारण, तुम्हाला ऑनलाईन सेलच्या ऑफर्सची लिंक आली असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? अशी लिंक पाठवून तुमची फसवणूक होऊ शकते का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

मोबाईलवर दिवाळी डिस्काउंट ऑफर्सची लिंक आली असेल तर सावध व्हा. तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमचं बँक खातं खाली होईल.

हा दावा करण्यात आलाय...कारण, दिवाळीसाठी बरेचजण ऑनलाईन शॉपिंग करत असतात...आणि मोठे डिस्काऊंट दिलं तर लगेच लिंक उघडून ऑनलाईन शॉपिंग केली जाते...त्यामुळे ज्या लिंक मोबाईलवर येतात त्यावर खरेदी केल्यास खरंच डिस्काऊंट ऑफर मिळते का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली... याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने सायबर एक्स्पर्टकडून माहिती मिळवली...

सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट बनवतात

मोठ्या कंपनीचे लोगो, रंग आणि डिझाईनचा वापर करतात

महागड्या वस्तूंवर 70 ते 90 टक्के सवलत देतात

लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करताच खातं हॅक होतं

लिंकद्वारे फोनमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करतात

सायबर गुन्हेगार फोनचा संपूर्ण ताबा घेऊन फसवणूक करतात

स्वस्तात वस्तू मिळते या आमिषाला बळी पडून ग्राहक घाईघाईने पैसे भरतात...आणि हीच संधी साधून सायबर गुन्हेगार फसवणूक करतात...त्यामुळे तुम्हाला जर अशी कोणतीही लिंक आली तर आधी सत्यता तपासून पाहा...ऑनलाई शॉपिंग करतात अधिकृत ऑनलाईन साईट्सवरूनच करा...त्यामुळे आमच्या पडताळणीत

स्वस्तातील ऑनलाईन सेल अकाऊंट रिकामं करेल हा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींच्या एका पोस्टने राजकारण तापलं!

मुख्यमंत्र्यांचा शिंदेसेनेला दे धक्का! मंत्र्यांचे अधिकार काढले, महायुतीत वाद पेटणार?

Easy Rangoli Designs For Diwali: दिवाळीसाठी सोप्या 5 रांगोळ्या, डिझाईन्स आत्ताच सेव्ह करून ठेवा

राजेंनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी काढला अफजल खानचा कोथळा; गोपीचंद पडळकरांनी बदलला छत्रपतींचा इतिहास

Government Scheme: ऐन दुष्काळात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारची महत्त्वकांक्षी योजना बंद

SCROLL FOR NEXT