Dispute Between Two Wife and Husband Saam Tv
व्हायरल न्यूज

Dispute Between Two Wife and Husband: 2 बायकांच्या भांडणात फसला नवरा; भररस्त्यावरच चपलीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Viral News: या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shivani Tichkule

Viral Video: बिहारच्या शरीफ सदर रुग्णालयात कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एकाच तरुणाला आपला पती म्हणून दोन महिलानमध्ये जोरदार भांडण झाले. या दोन महिलांमध्ये झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रेमजीत नावाच्या तरुणाने आपल्या पाहल्या पत्नीला न सांगता दुसरे लग्न केले. प्रेमजीत हा व्यवसायाने मजूरी करतो. तो बिहार शरीफच्या लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील रामचंद्रपूर फिश मार्केटचा रहिवासी आहे. त्याची दुसरी पत्नी गरोदर आहे. तिच्या तपासणीसाठी प्रेमजीत हा शरीफ सदर रुग्णालयात आला होता.(Latest Marathi News)

दरम्यान, त्याच वेळी प्रेमजीतच्या पहिल्या पत्नीला याबाबत माहिती मिळाली. मग तिने सासूसह सदर रुग्णालय गाठले. प्रेमजीतला दुसऱ्या पत्नीसोबत पाहून पहिल्या पत्नीचा पारा चढला. त्यानंतर पहिल्या पत्नी आणि दुसऱ्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा सर्व प्रकार पाहून रुग्णालयात (Hospital) काही काळासाठी गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. (Viral News)

पहिली पत्नीनीने केलेल्या आरोपानुसार, तिचे प्रेमजीतसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत. परराज्यात राहून मजुरीचे काम करत असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. मात्र, त्याने दुसरे लग्न करुन तो दुसऱ्या ठिकाणी राहायला लागला होता. (Viral Video)

दुसरीकडे प्रेमजीतने देखील आपल्या पहिल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. तो म्हणाला की, पहिली पत्नी मला त्रास देत होती. त्यामुळेच मी नवादा कोर्टात दुसरे लग्न केले. प्रेमजीत म्हणतो की, मला दोन्ही पत्नींना एकत्र ठेवायचे आहे. पण पहिली पत्नी आमच्या आईकडे राहील, तिचा खर्च मी दर महिन्याला देईन आणि मी दुसऱ्या पत्नीसोबत राहीन. दरम्यान, प्रेमजीतची पहिली पत्नी महिला पोलीस ठाणे गाठले आहे. तर दुसरीकडे तिचा पती दुसऱ्या पत्नीसह फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT