गहू निवडणं एक आव्हानात्मक कामच मानायलं हवं. गव्हातून खडे निवडणं म्हणजे अनेकांसाठी डोळ्यांची एक परीक्षाच असते. मात्र, गहू निवडण्यासाठी एका पठ्ठ्याने भन्नाट आयडिया वापरली आहे. या पठ्ठ्याने गहू वापरण्यासाठी चक्क कूलर आणि स्टूल वापरला आहे. हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
गहू निवडण्यासाठी पंख्याचा वापर केला जातो. हाताने गहू पंख्यासमोर हळूहळू फेकला जातो. मात्र, आता एका पठ्ठ्याने कूलर आणि स्टूलच्या मदतीने गहू निवडण्यासाठी देशी जुगाड केला आहे. या पठ्ठ्याचा देशी जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड पसंत पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गहू निवडण्यासाठी कूलरवर स्टूल ठेवला आहे. या स्टूलमधून हा गहू खाली पडतोय, त्यानंतर दुसऱ्या जागी पडून पडला जात आहे. ही भन्नाट आयडिया वापरण्यासाठी एक स्टूल आणि त्याला छिद्र आहे. त्याचबरोबर एक कूलर हवा आहे.
देशी जुगाडचा व्हिडिओ इन्स्टाग्राम पेज @fun_reels_wale वर १५ ऑक्टोबर रोजी पोस्ट केला होता. या व्हिडिओला 13.6 कोटी जणांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओला ४ लाख ६२ हजार लाईक्स मिळाले आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका स्टूलमध्ये कूकर उलटा ठेवला आहे. त्या स्टूलला दोन-तीन छिद्र पाडले आहेत. या कूलरच्या वायब्रेशनमुळे गहू खाली पडत आहेत. यानंतर गव्हातील कचरा उडून जात आहे. हा हटके जुगाड नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.