Soya Chap Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू, हा किळसवाणा VIDEO पाहून तुम्ही सोया चाप खाणं सोडाल

Soya Chap Viral Video: सोया चापच्या कारखान्यातील किळसवाणा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा घाणेरडापणा पाहून तुम्ही सोया चाप खाणं सोडाल.

Priya More
  • दिल्लीतील सोया चाप कारखान्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

  • व्हायरल व्हिडीओमध्ये घाणेरड्या पद्धतीे सोया चाप बनवल्याचे दिसत आहे

  • कारखान्यातील अस्वच्छता या व्हिडीओत दिसत आहे

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तसाप सुरू केला

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. असाच एक संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. पनीर आणि नॉनव्हेजला पर्याय म्हणून खाल्ला जाणारा सोया चापचा हा किळसवाणा व्हिडीओ असून तो किती घाणेरड्या पद्धतीन तयार केला जातो ते या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा ३७ सेकंदाचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. सोया चाप तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यात कामगार किती वाईट पद्धतीने सोया चाप तयार करत आहे हे खूपच भयंकर आहे. हा व्हिडीओ नोएडा सेक्टर २७ मधील एका कारखान्यातील आहे. या कारखान्यात खूपच अस्वच्छता आहे. त्यात हे कामगार अर्धनग्न अवस्थेत सोया चाप तयार करत आहेत. सोयाचाप बनवताना ते त्यावर झोपून आणि अंघोळ करत रिल्स तयार करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका कारखान्यात सोया चाप तयार करण्याचे बॅटर जमिनीवर टाकले आहे. ते जमिनीवर टाकून त्यावर एक तरुण झोपला आहे. तर दुसरा तरुण त्याचे हात पकडून त्याला त्यावर लोळवत आहे. तर आणखी एक पाईपने पाणी त्या तरुणाच्या अंगावर टाकताना दिसत आहे. या कारखान्यात खूपच अस्वच्छता पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून नेटकरी संतापले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT