Delhi Metro Girls Fight Video 
व्हायरल न्यूज

Delhi Metro: 'मी असं तोडून टाकीन ना'...; दम देताच सटसट लगावल्या कानाखाली, दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा मुलींची हाणामारी| Video Viral

Delhi Metro Girls Fight Video: मेट्रोमध्ये पुन्हा एक हाणामारीची घटना घडलीय. दोन मुलींमध्ये जागेवरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या मुली सुरुवातीला बाचाबाची करतात नंतर हाणामारी करू लागतात. त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

दिल्ली मेट्रोमध्ये आता मारामारी होणं एक साधारण घटना झालीय. नेहमी कोणाचा ना कोणाची हाणामारी येथे होत असते. तरुण मुलं असो की म्हातारे माणसं सर्वजण डब्ल्यूडब्ल्यूएफमधील पैलवानासारखं एकमेकांना भिडत असतात. आता अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात पुन्हा एकदा दोन मुली एकमेकांना भिडल्या आहेत. या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झालीय.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहून शकतो की, दोघांमध्ये जागेवरून वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांवर जोरजोरात ओरडत असतात. त्यानंतर सीटवर बसलेली मुलगी हिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातलंय. ती एका दुसऱ्या मुलीच्या कानाखाली मारते. त्यानंतर ती मुलगी तिला धमकी देताना दिसतेय.

मुली आपापसात इतक्या वाईट पद्धतीने भांडू शकतात हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मग लोकांनी भांडण सोडवण्याऐवजी थेट हातातील मोबाईलचा कॅमेरा चालू करून त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ शूट केल्याचही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'तुला माहित आहे का मी कोण आहे? मी खूप तोडून टाकीन...'

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी सीटवर बसलेली आहे. तर दुसरी गर्दीत उभी असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद सुरू होता. मेट्रोच्या डब्यात उभी असलेली मुलगी बसलेल्या मुलीला कोणाला तरी बोलवायला सांगते. यादरम्यान ती बसलेल्या मुलीच्या हाताला झटका देते. यामुळे संतापलेली मुलगी ती उठते आणि वाद घालणाऱ्या मुलीला जोरात चापट मारते.

यानंतर ब्लॅक टॉप घातलेली मुलगी म्हणते, 'माझा हात सोडला तर तुला तुरुंगात जाण्याची पाळी येईल.' मग परत धमक्या देत ती पांढऱ्या रंगाचा टॉप घातलेल्या मुलीला म्हणते, तुला माहीत आहे का मी कोण आहे? मी खूप तोडून टाकीन...'

यावरुन अजून राग अनावर झाल्याने सीटवर बसलेली मुलगी अजून एक जोरदार चापट उभ्या असलेल्या मुलीच्या कानाखाली मारते. दरम्यान, काळ्या रंगाचा टॉप घातलेली मुलगी म्हणते - 'मी तुला आता मारलं तर तू इथे राहणार नाहीस.' 'मी एक गायक आहे.' असं म्हणत ती तिचा फोन काढते आणि म्हणते, 'मी आत्ता कॉल करत आहे आणि आताच तुला अटक करेन, दम देत आहे.

विशेष म्हणजे दोन मुलींचं भांडण होत असताना दुसरे प्रवाशी फक्त बघत होते. कोणीच त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही. उलट बघ्याची भूमिका घेऊन आपल्या मोबाईलमध्ये त्यांच्या हाणामारीचं शुटिंग करू लागले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या या क्लिपबद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र युजर्स या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT