Delhi Metro Video Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोत लेडीज कोचमध्ये मद्यापी तरुणाची एन्ट्री; महिलांनी केलं असं काही, VIDEO जोरदार व्हायरल

Ruchika Jadhav

Drunken Man Enters in Ladies Coach :

दिल्ली मेट्रो म्हणजे नेहमीच वेगळं आणि इंट्रेस्टींग स्टोरीचं ठिकाण. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण दिल्ली मेट्रोमध्ये नेहमीच काही ना काही राडे आणि अतरंगी घडामोडी घडतच असतात. आता देखील दिल्ली मेट्रोतील लेडीज कोचमध्ये एका व्यक्तीने एन्ट्री केली. यामुळे लेडीज कोचमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकल ट्रेन असो अथवा मेट्रो ट्रेन सगळीकडेच महिलांसाठी आरक्षित डब्बा असतो. महिलांच्या डब्ब्याबाहेर किंवा आसपास कोणताही पुरुष आला की त्या लगेचच आरडाओरडा करत त्याला तेथून पळवून लावतात. आता देखील असाच काहीसा प्रकार घडला. एक व्यक्ती थेट दारू पिऊन मेट्रो ट्रेनमध्ये आला होता.

नशेमध्ये आपण कुठे आहोत हे त्याला निट समजत नव्हते. तो सिटवर बसलेला असताना अन्य महिला तेथे आल्या. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा व्यक्ती ज्या सिटवर बसला आहे तेथे काही अंतर सोडून महिला बसल्यात. तर काही जणी उभ्या आहेत. आता या व्यक्तीला पाहून महिला चांगल्याच संतापल्यात.

हा लेडीज कोच आहे तुम्ही येथे कसे आले? असं विचारत महिला या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगतात. मात्र हा व्यक्ती त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करतो. लेडीजप्रमाणे जेन्ट्स कोच देखील बनवला पाहिजे, असंही हा व्यक्ती बोलतो. त्यानंतर तो तेथून निघून जातो. आता ही सर्व घटना तेथीलच एका महिलेने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे.

@himani9808 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर कमेंटमध्ये दिल्ली मेट्रोत सदर व्यक्ती दारू पिऊन आला होता, असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील आता विविध कमेंट करत आहेत. दारू पिल्यास अशा व्यक्तींना मेट्रो ट्रेनमध्ये एन्ट्री देऊ नये, असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. मेट्रो कर्मचाऱ्यांकडे अशा व्यक्तींची तक्रार केली पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT