Dog Attack Video Saamtv
व्हायरल न्यूज

Dog Attack Video: आजोबांच्या मांडीवरुन चिमुकलीला हिसकावले...कुत्र्यानं लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

Gangappa Pujari

Delhi Dog Attack Viral Video:

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजधानी दिल्लीमधून अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

दिल्लीमध्ये आजोबांच्या कुशीत असलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकलीवर पिटबुलने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्या शरीरावर १८ टाके पडले आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीच्या (Delhi) बुरारी भागात एका दीड वर्षाच्या चिमुरडीवर पिटबुलने हल्ला चढवल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली. ही चिमुकली आपल्या आजोबांच्या मांडीवर खेळत होती. याचवेळी फिरवायला आणलेल्या माणसाच्या हातातून हिसका देऊन कुत्र्याने चिमुकलीला आजोबांच्या मांडीवरुन खेचले अन् हल्ला चढवला. या पीटबुलने चिमुकलीच्या शरिराचे अक्षरशः लचके तोडले.

कुत्र्याच्या या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिचा पाय ३ ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे, तसेच शरीरावर १८ टाके पडलेत. तिच्यावर गेल्या १७ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. या भयंकर घटनेनंतर कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) आजोबांच्या हातातून खेचून पीटबुलने चिमुकलीवर हल्ला चढवल्याचे दिसत आहे. कुत्र्याने मुलीवर इतका जबर हल्ला केला की त्याला सोडवण्यासाठी चार ते पाच जण प्रयत्न करत आहेत, मात्र कुत्रा अक्षरशः तुटून पडला असून लोकांनी मारल्यानंतरही तो मुलीचा पाय जबड्यातून सोडत नाही.

अखेर काही वेळाने मुलीला कुत्र्याच्या तावड्यातून सोडवण्यात यश आल्याचे दिसत आहे. ज्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना माध्यमांवर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT