Monkey And Dog Fighting Viral Video Instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: कुत्रा अन् माकडामध्ये जोरदार जुंपली; हायव्होल्टेज सामना कोण जिंकलं? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

Chetan Bodke

Monkey And Dog Dangerous Fighting

आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसतात. अनेकदा पाळीव प्राण्यांचे गोंडस व्हिडीओ, तर कधी जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपल्याला एका श्वानाचा आणि एका माकडाच्या मारमारीचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

खरंतर श्वान आणि माकड हे दोन्हीही शांत पाळीव प्राणी आहेत. जोपर्यंत त्यांची कोणीही खोड काढत नाही, तो पर्यंत ते आपल्याला काहीही करत नाहीत. पण एका व्हायरल व्हिडीओत श्वान आणि माकडात चांगलीच जुंपलेली असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये श्वान आणि माकडामध्ये जोरदार भांडण झालेले दिसत आहे. वाद इतका विकोपाला जातो की, माकडाने श्वानाचं डोकं जोरात पकडल्याचे दिसून येत आहे. ही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला हे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत की काय ? असा प्रश्न पडतो.

व्हायरल व्हिडीओत, श्वान आणि माकड कशाप्रकारे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, हे दिसत आहे. एकमेकांच्या विरोधात उभे राहत रागाने पाहतात आणि जोरदार भांडणं करतात. या व्हिडीओत माकडाने काळया रंगाची पँट घातलेली दिसतेय. काही वेळाने त्यांच्यात भांडण होते.

भांडणात माकड श्वानाच्या अंगावर असा तुटून पडला की, त्याला गोल गोल फिरवल्यानंतरच तो शांत बसला. पण त्या माकडाने श्वानाच्या अक्षशः नाकी नऊ आणले. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, माकडाने त्या श्वानाची थेट अंगावर बसून मानच पकडली. श्वान त्यावेळी ओरडत होता, तरीही त्या माकडाने त्याला सोडलं नाही. भांडणाचा शेवट व्हिडिओमध्ये दिसत नाही. त्याच्या पुढे नेमकं काय झालं असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला. (Viral Video)

सध्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माकड आणि श्वानाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. माकड आणि श्वानाच्या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून बरेच लाईक्स आणि कमेंटही आल्या आहेत. (Social Media)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT