Ladies Coach Viral Video: कुठे उतरणार? सांगून सांगून तोंड दुखलं; महिलेनं हातावर Last लिहून घेतलं, भन्नाट जुगाड VIRAL

Mumbai Local Viral Photo: महिलांनीच स्वतः हे नियम तयार केलेत आणि ते प्रत्येक महिलेला पाळावे लागतात.
Ladies Coach Viral Video
Ladies Coach Viral VideoSaam Tv
Published On

Mumbai Local News:

मुंबई लोकल ट्रेन म्हणजे नुसती गर्दी, धावपळ आणि धकाधकीचे जीवन अशात या मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता देखील सोशल मीडियावर एका महिलेचा भन्नाट जुगाड व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे. (Latest Ladies Coach Viral Video)

Ladies Coach Viral Video
Mumbai Local Train Viral Video: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं; जिवावर उदार होऊन ऑफिसला जाणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई लोकलच्या लेडीज कोचमध्ये ट्रेनमध्ये चढण्याचे, बसण्याचे, सीट पकडण्याचे काही नियम आहेत. हे नियम कोणी बनवले नाहीत. महिलांनीच स्वतः हे नियम तयार केलेत आणि ते प्रत्येक महिलेला पाळावे लागतात.

लेडीज डब्ब्यात चढल्यावर प्रत्येक महिला सीट विचारते. तुम्ही कुठे उतरणार? तुमची सीट मला द्या... असं सांगितलं तरच सीट मिळते नाहीतर पूर्णवेळ उभं राहावं लागतं. अशात सीएसएमटीवरून अंबरनाथ ट्रेनमध्ये बसलेली एक महिला शेवटच्या स्थानकात उतरणार होती. तिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून ट्रेन पकडली. आता प्रत्येक स्थानकात महिलांचा घोळका चढत होता.

प्रत्येक महिला सीएसटीएमपासून बसलेल्या या महिलेला कुठे उतरणार विचारायाच्या. प्रत्येकीला सांगून सांगून या महिलेला कंटाळा आला. त्यामुळे तिने थेट आपल्या हातावर लास्ट असं इंग्रजीत लिहून घेतलं. कोणत्या महिलेने कुठे उतरणार विचारलं की महिला थेट हात दाखवत होती.

महिलेचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई लोकलमधील महिलांचे स्वतःच्या सोईने आणि मनाने ठरवलेले नियम पाहून सगळेच चकित होतात. कधीतरी प्रवास करणारी एखादी महिला ट्रेनमध्ये आली की, काय करावे, कसे उभे राहावे हे काहीच समजत नाही. आता लास्ट सांगणाऱ्या महिलेचा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ladies Coach Viral Video
Women Fight in Local Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दे दणादण, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com