Alisha Khedekar
प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगावी लागू नये; न बोलताही भावना ओळखणारा जोडीदार मनाला खूप जवळचा वाटतो.
तिच्या मतांचा, स्वप्नांचा आणि निर्णयांचा आदर करणारा साथीदार नात्यात सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करतो.
अनावश्यक संशय न घेता विश्वास ठेवणारा साथीदार नात्यात मोकळेपणा आणि आपलेपणा टिकवून ठेवतो.
आनंदात सगळे सोबत असतात; पण कठीण दिवसांत खंबीरपणे हात धरून राहणारा जोडीदार खरा आधार ठरतो.
प्रत्येकाकडून चुका होतात; त्या समजून घेऊन संवादातून मार्ग काढणारा जोडीदार नात्यात कटुता वाढू देत नाही.
प्रेम असूनही वैयक्तिक वेळ, मित्र आणि आवडी जपण्याची मोकळीक देणारा साथीदार नात्यात निरोगी स्वातंत्र्य ठेवतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा