Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : डोक्यावर ग्लास त्यावर कळशी घेऊन महिला एक नंबर नाचली; हळद सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

Women Haldi Dance : अशात काही व्यक्ती नाचताना स्टंट देखील करून दाखवतात आणि सर्वांचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा हळदीमधील डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

हळद म्हटलं की डान्स आणि गरमागरम बिर्याणी आलीच. प्रत्येक व्यक्ती हल्ली हळदीमध्ये डीजेच्या तालावर नाचताना दिसतात. अशात काही व्यक्ती नाचताना स्टंट देखील करून दाखवतात आणि सर्वांचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा हळदीमधील डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने आपल्या डोक्यावर एक ग्लास ठेवला आहे. त्यानंतर यावर तिने एक कळशी ठेवली आहे. डोक्यावर हे सर्व घेऊन महिला स्वतःचा बॅलेन्स सांभाळत नाचत आहे. नाचताना तिचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

हळदी असल्याने मोठा डिजे लावण्यात आला आहे. या डीजेच्या तालावर नाचणाऱ्या महिलेला पाहून असे वाटते की, आता तिचा तोल जाईल आणि कळशी खाली पडेल. मात्र महिलेने केलेल्या बॅलेन्सची खरोखर दाद द्यावी लागेल. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर कमेंट केल्यात.

एकच नंबर, फार छान डान्स केला असं म्हणत महिलेच्या कलेला दाद दिली आहे. तसेच काहींनी यावर फायर ईमोजी देखील शेअर केले आहेत. महिलेने डोक्यावर ठेवलेली कळशी भरलेली आहे की रिकामी आहे असा प्रश्न देखील काहींना पडला आहे.

सोशल मीडियावर हळदीमधील डान्सचे असे अनेक व्हिडिओ या आधी देखील व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये तर हळदीला एका आजोबांनी पाण्याने भरलेला हंडा आपल्या दातांनी उचलला होता. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यासह लग्नातील महिला तसेच पती पत्नीच्या डान्सचे देखील अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

SCROLL FOR NEXT