Dahihandi On Water Well Saam TV
व्हायरल न्यूज

Dahihandi On Water Well: आला रे आला गोविंदा आला! पोरांनी थेट ४० फूट खोल विहिरीवर बांधली दहीहंडी; थक्क करणारा VIDEO व्हायरल

Dahihandi On Water Well Video Viral: अनेकदा १० ते १२ थर रचूनही हंडी फुटत नाही. अशात जर विहिरीत एखादी दहीहंडी बांधली तर?

Ruchika Jadhav

Alibag News: दहीहांडी म्हटलं की प्रत्येक गोविंदामध्ये उत्साह संचारतो. गोविंदांची पथके महिनाभरापासूनच तयारीला लागतात. या सहासी खेळात रस्त्यांवर उंच उंच मनोरे पाहायला मिळतात. रस्तावर ही दहीहंडी फोडताना गोविंदांना मोठी मेहनत घ्यावी लागते. अनेकदा १० ते १२ थर रचूनही हंडी फुटत नाही. अशात जर विहिरीत एखादी दहीहंडी बांधली तर? (Latest Gopalkala Viral Video)

विहिरीवर उभेराहून हंडी फोडतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोकणातील एका गावात तब्ब्ल ४० फूट खोल विहिरीत दहीहंडी बांधण्यात आली आहे. ४० फूट खोल विहीर पाहताच अनेकांचे डोळे गरगरू लागतात. अशात व्हायरल व्हिडीओत गावातील सर्व गोविंदा पथक विहिरीवर दहीहंडी फोडण्यासाठी जमले आहेत.

होसाळीकरांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर गेल्या वर्षी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. गोपाळकालाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ अलिबागच्या कुर्डुस देऊळआळीमधील आहे. या गावात विहिरीत दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे.

या गावात डबकी आणि माळीण नावाच्या दोन विहिरी आहेत. येथील गोविंदा विहिरीच्या काठावर उभे राहतात एवढ्याश्या जागेत ते एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून विहिरीत झेप घेतात आणि हंडी फोडतात. यावेळी गावातील सर्व मंडळी हा सहासी खेळ पाहण्यासाठी जमा होतात. दहीहंडीचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार गट महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर?

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

Maharashtra Election: सोलापुरात भाजपला डच्चू; शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT