Crows Best Bus Ride 
व्हायरल न्यूज

Crows Bus Ride: बेस्ट बसच्या टपावर बसून कावळ्यांचा फुकटात प्रवास; Video व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Crows Best Bus Ride: मुंबईतील बेस्ट बसवरुन तुम्ही प्रवास केलाय का? मुंबईत आल्यानंतर या बसमधून प्रवास केला नाही तर तुमचा मुंबई फिरण्याचा आनंद पूर्ण झाला नाहीये. मुंबईत येणारे अनेक पर्यटक या बसमधून प्रवास करत मुंबई फिरण्याचा आनंद घेतात. आता या बस सफारीचा आनंद कावळ्यांनी घेतलाय.

Bharat Jadhav

मुंबईच्या बेस्ट बसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शहरात आलेले पर्यटक मुंबईची ओळख असलेल्या बेस्ट बस बसची राईड नक्कीच घेतात. बेस्ट बसची राईड कशी असते याचा आनंद चक्क कावळ्यांनी घेतलाय, तेही विनातिकीट, एरव्ही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना बेस्ट प्रशासन दंड घेत असते. पण बेस्ट बसच्या टपवरती बसून कावळ्यांनी सफारीचा आनंद घेतलाय.

कावळ्यांच्या सफारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओ खूप प्रतिक्रिया करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, कावळे विना तिकीट प्रवास करत असल्याने सरकारने त्यांना दंड ठोठावला पाहिजे. एक्स या सोशल मीडियाच्या साईटवर @krownnist” या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. “ते कुठे जात आहेत?” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईतील बेस्ट (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) बसच्या टपावर बसून कावळे प्रवास करताना दिसत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, व्हिडिओ 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलाय. हा व्हिडिओ पाहणारे आणि त्याला शेअर करणाऱ्यांच्या संख्ंयेत अजूनही वाढतेय. कावळ्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यापैकी एकाने म्हटलंय की, “ कावळे तिकिटाशिवाय,” प्रवास करत असल्याचं म्हटलंय. कावळ्यांना उडण्याचा कंटाळा आला की तेही सार्वजनिक वाहतूक वापरतात, असं एका दुसऱ्या युझरने म्हटलंय.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

"हा व्हिडिओ पूर्ण का नाही?" .

"कावळे सर्व पक्ष्यांमध्ये हुशार आणि माझे आवडते पक्षी असल्याचं एका नेटकऱ्यान म्हटलंय.

"येथे कावळे देखील सार्वजनिक वाहतूक वापरत आहेत.

एकजण म्हणाला कावळे विनातिकीट प्रवास करत आहे. त्यावर एकाने उत्तर दिलंय, भारताच्या आर्थिक राजधानीत जास्त प्रवास भाडे आहे, त्याचा संदर्भ देत हा युझर म्हणाला “स्थलांतर करण्यासाठी भाडे परवडत नाही,” त्यामुळेच कावळे विनातिकीट प्रवास करत असल्याचं म्हटलंय. तर एका युझरने कावळे कुठे जात असल्याची प्रतिक्रिया दिली होती, त्याला एकाने ते मुंबई दर्शन करायला जात आहेत, असं उत्तर दिलंय. तर एकाने तर सांगितले की ते “क्रॉफर्ड मार्केट” ला जात असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT