Couple Video Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Couple Video Viral : खोल विहिरीच्या मधोमध कपलचा रोमान्स; रिल व्हिडीओसाठी झोक्यावर धक्कादायक स्टंट, VIDEO व्हायरल

Couple Reels Video Viral : झाडांचा आधार घेत विहिरीच्या मधोमध हा झोका बांधण्यात आला आहे. खोल विहिरीत जाड दोऱ्याच्या सहाय्याने त्यांनी थेट एक चार पायांची खाट बांधली आहे.

Ruchika Jadhav

Stunt in Well Video :

सोशल मीडियावर व्हायरल व्हावं, सर्वत्र आपली चर्चा असावी, आपल्याला लाखो व्हुव्ज मिळावेत यासाठी आजकाल प्रत्येकजण काहीही अतरंगी प्रकार करताना दिसत आहे. रिल व्हिडीओ बनवण्याच्या नादात आपण नेमकं काय करतोय याचं भान देखील नागरिकांना राहिलेलं नाही. अशातच सोशल मीडियावर एक खतरनाक स्टंट रिलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विवाहीत जोडपं रिल व्हिडीओ बनवत आहेत. रोमान्स आणि डान्स करत त्यांना हा रिल व्हिडीओ शूट करायचा होता. आता त्यासाठी यांनी झोका बांधायचं ठरवलं. मात्र हा झोका त्यांनी झाडाला नाही तर विहिरीला बांधला आहे. झाडांचा आधार घेत विहिरीच्या मधोमध हा झोका बांधण्यात आला आहे. खोल विहिरीत जाड दोऱ्याच्या सहाय्याने त्यांनी थेट एक चार पायांची खाट बांधली आहे.

वहिरीच्या मधोमध बांधलेल्या या खाटेवर दोघेही बसलेत आणि एका गाण्यावर डान्स करत आहेत. तसेच एक व्यक्ती विहिरीबाहेर उभा राहून यांचा रिल व्हिडीओ शूट करत आहे. @sjetivadi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या दोघांना मरण्याची हौस आहे का? असं काहींनी म्हटलंय. तर भाऊ पूर्ण reel बघितली पण ते पडले नाही? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. या दोघांना दगड बांधून पाण्यात सोडलं पाहिजे. पागल पणा नका करू रे आयुष्य एकदाच भेटत असत असलं काही करू नका. हे मूर्ख like आणि फोल्लोव्हर साठी काही पण करायला तयार झालेत आश्या पोस्टला लाइक करत जाऊ नका, अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.

सदर व्हिडीओ इतका भयंकर आहे की पाहता पाहता काळजात काही क्षणासाठी धडकी भरते. कारण आधी हे दोघेही उभे राहून नाचत आहेत. मात्र नंतर काहीच सपोर्ट नसल्याने ते दोघेही खाली पडतात. पती पत्नी दोघेही खाली बसतात तेव्हा हे आता विहिरीत पडणार असं वाटतं. आता या दोघांना पोहता येत असेल तर विषय वेगळा आहे. मात्र पोहता येत नसेल तर मृत्यू निश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT