Pune couple performs obscene stunt on highway bike saam tv
व्हायरल न्यूज

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Pune Viral News: पुण्यातील प्रेमीयुगुलांच्या स्टंटबाजीनं अनेकांच्या भुवया उंचावलेत.. प्रेमीयुगुलांनी नेमकं असं काय केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं..शिक्षणासाठी, IT तील नोकरीसाठी अनेक जण गावाकडून मुंबईचा रस्ता धरतात. मात्र याचं पुण्यातील प्रेमी युगुलांचे कारनामे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरलेत.. याआधीही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्याही जीवावर उठलेल्या पुण्यातील स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच.

त्यातच आता पुण्यात दुचाकीवर प्रेमीयुगुलाचा अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँक वर उलटी बसली आहे आणि तरुण सुसाट गाडी चालवतोय. हा व्हिडिओ पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातील शिंदेवाडीतील असल्याचं बोललं जातंय.

आपल्याच मस्तीत चाललेल्या या प्रेमी युगुलांचे रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेकांनी व्हीडिओ काढले ..मात्र प्रेमात अखंड बुडालेल्या दोघांना मात्र दुनियाची फिकर नव्हती.. त्यांनी ही स्टंटबाजी सुरुच ठेवली... आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याला अश्लील चाळे म्हणायचं का उतू चाललेलं प्रेम! हे तुम्हीच ठरवा.. मात्र प्रेमी युगुलांचा सुरु असणारा हा हुल्ल़डपणा थांबणार का? स्वत: सह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रेमी युगुलांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रस्त्याच्या वादातून तणाव! खेड तालुक्यात जैदवाडीत दगडफेक आणि वाहनांची तोडफोड

Shirvale Recipe : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

SCROLL FOR NEXT