Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shoking Video: बाप रे! बाटली समोर धरताच कोब्राने व्यक्तीवर केला हल्ला, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चकित

Viral Video In Snake: एका साप पकडणाऱ्याने कोब्रा सापाला पकडण्यासाठी अनोखी पद्धत वापरली. त्याने मोठ्या बाटलीचा उपयोग केला, परंतु कोब्राने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरारक प्रसंग पाहून सर्वच थक्क झाले.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर दररोज अजगर, कोब्रा यांसारख्या सापांचे रोमांचक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या '@crazyclipsonly' या अकांउटने ट्विटरवर एक थरारक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्पमित्र कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, कोब्रा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले असून, इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओमध्ये एक सर्पमित्र मोठ्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीच्या मदतीने कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण जेव्हा त्याने बाटली सापाच्या तोंडाजवळ नेली, तेव्हा कोब्रा जोरात हल्ला करतो आणि त्याला थोड्या वेळासाठी घाबरवतो. पण, दोन सेकंदांच्या भीतीनंतर तो पुन्हा प्रयत्न करतो. अखेर, 42 सेकंदांच्या संघर्षानंतर कोब्रा बाटलीत शिरतो, आणि सर्पमित्र त्याचे तोंड बंद करून सुरक्षितपणे साप पकडतो.

कोब्रा हा जगातील अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. धोका जाणवल्यास तो आपला फणा मोठा करतो. हा साप मुख्यतः आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतो आणि त्याची प्रजाती Cobra Naja आहे. कोब्राच्या न्युरोटॉक्सिक विषामुळे, त्याच्या दंशामुळे गंभीर जखमा होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे कोब्रा खूप धोकादायक ठरतो आणि त्याच्या जवळ जाण्याची टाळणी केली पाहिजे.

या अनोख्या साप पकडण्याच्या पद्धतीवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, हे खूप कठीण दिसतं, पण मला काय माहिती, मी अशा ठिकाणी राहत नाही. दुसऱ्याने म्हटले, मी साप दिसला की जितकं शक्य असेल तितक्या वेगाने पळतो. तिसऱ्याने, हे अवघड वाटतं, पण मेहनत तुम्हाला मजबूत बनवते. चौथ्या व्यक्तीने सांगितले, साप अंधाऱ्या ठिकाणी लपतात, त्यामुळे बाटलीचा वापर प्रभावी ठरतो. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT