Screw stuck near eardrum in child SAAM TV
व्हायरल न्यूज

VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

Screw stuck near eardrum in child: व्हिएतनाममध्ये एका लहान मुलाच्या कानदुखीमागे स्क्रू अडकल्याचं धक्कादायक कारण समोर आलं. एंडोस्कोपी तपासणीत प्रकार उघड झाला आणि वेळेत उपचारामुळे धोका टळला.

Surabhi Jayashree Jagdish

व्हिएतनाममध्ये एका लहान मुलाच्या कानदुखीच्या तक्रारीमागे गंभीर कारण आढळून आलंय. या मुलाच्या उपचारांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सुरुवातीला साधं इन्फेक्शन किंवा कानात पाणी गेलं असेल असं त्या मुलाच्या प्रकार असावा असे कुटुंबीयांना वाटलं. मात्र तपासणी केल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या मुलावर करण्यात आलेल्या उपचारांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

मुलाला कानदुखीचा होत होता त्रास

मुलाला अचानक कानात तीव्र वेदना सुरू झाल्या. घरच्या घरी नेहमीप्रमाणे साधे उपाय करण्यात आले परंतु वेदना कमी न होता वाढत गेल्या. मुलगा सतत रडत होता आणि अस्वस्थ दिसत होता. अखेर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर प्रकरण सामान्य नसल्याचा संशय डॉक्टरांना आला. यानंतर त्यांनी एंडोस्कोपीद्वारे कानाच्या आत तपासणी करण्यात आली.

एंडोस्कोपी फुटेजमध्ये आढळला धक्कादायक प्रकार

एंडोस्कोपी फुटेजमध्ये कानाच्या आत ईयरड्रमजवळ एक लहान स्क्रू अडकलेला स्पष्ट दिसून आलं. डॉक्टरांच्या मते, हा स्क्रू एखाद्या खेळण्याचा भाग असण्याची शक्यता आहे. कानाचा पडदा अत्यंत नाजूक असल्याने अशा वस्तू जवळ पोहोचल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.

डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया करत स्क्रू बाहेर काढला. सुदैवाने मुलाचा कानाचा पडदा सुरक्षित राहिला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, थोडाही उशीर झाला असता तर मुलाच्या कानाला गंभीर इजा होऊ झाली असती. अशा वेळी घरगुती उपायांपेक्षा तज्ञांकडे त्वरित जाणं महत्त्वाचं आहे.

उपचारांचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून प्रतिक्रिया येतायत. अनेकांनी याला पालकांसाठी इशारा म्हटलंय. काही कमेंट्समध्ये, 'लहान वस्तू मुलांच्या हातापासून दूर ठेवा' असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT