Sambhaji Nagar Saam Tv
व्हायरल न्यूज

Sambhaji Nagar: हॉटेलमध्ये दोन मित्रांना पिस्तुल दाखवत बेदम मारहाण, घटनेचा CCTV व्हिडिओ समोर

Sambhaji Nagar CCTV Video: छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हॉटेलमध्ये दोन मित्रांना पिस्तुल दाखवत बेदम मारहाण करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर पिस्तूल रोखल्याची घटना समोर आली आहे. अचानक दोन मित्रांवर पिस्तुल रोखल्याने हॉटेलमधील इतर व्यक्ती खूप जास्त घाबरल्याचे दिसत आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संभाजीनगरमधील या घटनेनंतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केले आहे. हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर तिघांनी हल्ला करत बेदम मारहाण केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या घटना वाढत आहेत. पिस्तुल घेऊन जीवे मारण्याची धमकी देणे किंवा कोयत्याचा धाक दाखवण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, सध्या याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरात एका हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे.हा सर्व प्रकार त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आशिष वसंतराव पवार आणि मनोज महाले यांनी सिडको पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

कार्तिक लोकल, कमलेश मुदीराज आणि जीवन कुरेवार अशी आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेत आरोपींजवळील पिस्तूल देखील जप्त केली आहे. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉटेलमध्ये माणसांची गर्दी असताना अचानक कोणी पिस्तुल घेऊन येऊच कसं शकतं?आरोपींकडे पिस्तुल आलंच कसं? असे अनेक प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT