Crocodile On Road in Chennai
Crocodile On Road in Chennai SaaM tv
व्हायरल न्यूज

Crocodile On Road in Chennai: संपूर्ण रस्त्यावर पूराचं पाणी, त्यात आली मगर; नागरिकांची पळापळ, पाहा थरारक VIDEO

Ruchika Jadhav

Chennai News:

पावसात आणि शहराला पूराच्या पाण्याने विळखा घातल्यावर पाण्यातील अनेक प्राणी जमिनीवर येतात. त्यात अनेक मोठे मोठे मासे जमिनीवर येतात. परंतु पावसाच्या पाण्याने मगर जमिनीवर आल्याचे कधी पाहिले आहे का? चैन्नईत एका ठिकाणी पुराच्या पाण्यात एक मगर रस्त्यावर वाहून आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण भारतात मिचॉन्ग चक्रिवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पावसामुळे सर्वत्र पूराचे पाणी साचले आहे. सर्व रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडूनये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशात येथील एका रस्त्यावर मगर चालत असल्याचे दिसून आले आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुराच्या पाण्यात ही मगर जमिनीवर वाहून आलीये. व्हिडिओत एक माणूस बाईकवरुन जाताना दिसत आहे. त्याच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला ही मगर दिसत आहे. चैन्नईच्या पेरुंगलाथूर भागात ही मगर दिसली आहे. तसेच या भागात मुसळधार पावसाने मासे, साप मगरी दिसल्या आहेत असं लोक म्हणत आहेत, असा दावा व्हायरल व्हिडीओत करण्यात आलाय.

हा व्हिडिओ सोशल मीडियाव प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी चैन्नईच्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. चेन्नईच्या @A1 या माध्यमसंस्थेच्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. पाण्यातून प्रवास करताना एखाद्या व्यक्तीचा या मगरीशी सामना झाला तर त्याचं जगणं मुश्कील आहे. व्हिडीओपाहून परिसरातील नागरिकांनी यावर भीती व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी अशी आशा व्यक्त केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT