Pune Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune Shocking News : पुण्यात स्कूल व्हॅनवर कोसळलं भलमोठं झाड; १० सेकंदाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे. शिवाय अनेक भागात मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या मुंबईसह सर्व राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा परिणाम पुण्यात जास्त दिसून आला आहे. पुण्यातील अनेक भागात छातीपर्यंत पाणी भरले आहे तर काहींना विभागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यात सर्व भीषण परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. परंतू काही मिनिटांपूर्वीच पुणे शहरातून एक धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यात धावत्या स्कूस व्हॅनवर झाडं कोसळलं आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला सर्व धक्कादायक प्रसंगहा आज सकाळी वडगाव शेरी परिसरातील आहे. सकाळच्या सुमारास सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे काही विभागातील शाळा सुरु आहेत तर काही ठिकाणी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेजमध्ये पाहू शकतो की, एका रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ सुरु आहे. त्यात सोसाट्याचा वाराही सुटला आहे. याच रस्त्यावरुन एक पांढऱ्या रंगाची स्कूलची व्हॅन जात आहे पंरतू पंरतू काही क्षणातच रस्त्याच्या कडेला असलेले झाड स्कूल व्हॅनवर जोरात पडते.

सुदैवाने जोरात पडणारे झाड व्हॅनच्या पुढच्या बाजूवर पडते. शिवाय त्या क्षणी तेथून काही बाईक स्वारही जात असतात. फक्त काही क्षणांच्या मिनिटाने दुचाकीस्वार वाचतात. परंतू एक दुचाकीस्वार झाडाचा धक्का लागून जमिनीवर पडतो. महाकाय झाडं पडताच परीसरातील नागरिक तेथे मदतीसाठी धावून जाताना दिसून येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वडगाव शेरी परिसरात घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. व्हॅनमधील सर्व विद्यार्थी(student) सुखरुप आहे. पावसाळ्यात याआधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत .मात्र अशा अपघातात अनेक व्यक्तींचा मृत्यूही झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

SCROLL FOR NEXT