Cat Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Cat Viral Video: हावरी मांजर! टीव्हीवरील नदीतील मासे पाहून बिथरली; मांजरीची करामत पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Cat Viral Funny Video: समोर वाहत असलेलं पाणी आणि वलगनीला असलेले मासे पाहून मांजरीसमोर वाहत असतात.

Ruchika Jadhav

Cat Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे अनेक व्हिडिओ समोर येतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की, जे पाहून पोट दूखेपर्यंत हसू येतं. आतादेखील सोशल मीडियावर असाच एका मांजरीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओपाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. तसेच यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. (Latest Viral Video)

मासे खायला प्रत्येकालाच आवडतात. अनेक खवय्ये मासे खाण्यासाठी लांबलांब प्रवास करुन चमचमीत मासे मिळतील अशा हॉटेल्सला भेट देतात. असाच मासे खाण्याचा मोह मांजरीलाही आवरला नाही आणि तिने थेट माशांवर ताव मारायला सुरुवात केली. मात्र यात या मांजरीची चांगलीच फजीती झाली आहे. मांजरीसमोर वलगनीला असलेले मासे (Fish) वाहत असतात.

मासे पाहून तोंडाला पाणी सुटलेली ही मांजर थेट पाण्याच्या वाहत्या प्रवाहावर उडी मारते. मात्र ती तेथे पोहचतच नाही. त्यामुळे ती पुन्हा एकदा पाण्यावर उडी मारण्याचा प्रयत्न करते. परंतु तेव्हा देखील मांजर (Cat) खाली पडते. मनीमाऊ समोर एक मोठ्या आकाराचा एलईडी टीव्ही लावलेला असतो. मांजर या टीव्हीवर वलगनीला आलेले मासे पाहत असते. कोणीतरी मुद्दाम मांजरीची अशी मस्करी केली आहे. मात्र तिचा हा व्हिडिओ आणि मासे खाण्याची धडपड पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

@TheBest या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यावर अवघ्या २ तासांत या व्हिडिओला १.१ मिलिअन पेक्षाही जास्त व्ह्यूव्ज मिळालेत. पाळीव प्राणी घरात अगदी माणसांप्रमाणेच वावरतात. त्यांना देखील आरामात मनोरंजनासाठी टीव्ही पहायचा असतो. असंच काहीसं या मंजरीचं झालं. मात्र तिच्या मालकाने तिची चांगलीच फजिती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

Renuka Shahane : "मला धाकट्या बहिणीसारखं वागवायचा..."; रेणुका शहाणेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT