Guys Kissing On Scooty: बाबो! धावत्या दुचाकीवर दोन मुलांनीच केलं एकमेकांना लीपलॉक किस, पाहा Video

Rampur Viral Video: तरुणाईला खरोखर वेड लागलं आहे की काय? असा प्रश्न निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Rampur Viral Video
Rampur Viral VideoSaam TV
Published On

Uttar Pradesh News: सोशल मीडियावर आजवर अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल झालेत. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर असलेल्या प्रेमी युगुलांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतायत. अशातच आता तरुणाईला खरोखर वेड लागलं आहे की काय? असा प्रश्न निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

दुचाकीवर बसून अगदी एखाद्या चित्रपटातील हिरो हिरोईन प्रमाणे प्रेमी युगुल वागत आहेत. एका व्हिडिओमध्ये तरुण तरुणी एकमेकांना लिपलॉक किस करत आहेत. तर आणखीन एका व्हिडिओमध्ये दुचाकी चालवणाऱ्या मुलाला समोरून घट्ट मिठी मारून तरुणी बसली आहे. इतकेच नाही तर एका तरुणाने चक्क दुचाकीवर मद्यपान केलं आहे.

Rampur Viral Video
Rajasthan Viral Video: बापरे, खतरनाक! लग्न मोडल्याने चिडलेल्या तरुणाचा प्रताप; तरुणीला भरदिवसा पळवलं अन् जंगलात नेवून...

तरुणांचे हे व्हिडिओ काही कमी होते तोच आता दोन तरुणांना दुचाकीवरील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका दुचाकीवर तीन तरुण बसले आहेत. यातील मागे बसलेल्या दोन तरुणांना मोह आवरत नाही आणि ते दोघेही एकमेकांना किस करतात. किस करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ मागून येणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

सदर व्हिडिओ उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूरमधील आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी या दोन्ही तरुणांचा शोध घेतला. दोघांवरही गुन्हा दाखल करत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रामपुर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

Rampur Viral Video
Chalisgaon Crime News: चाळीसगाव तालुका हादरला; एकाच दिवसात दोन खून

व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होताच नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्यात. एकाने यांना मुली मिळाल्या नाहीत का असं म्हटलं आहे. आजूबाजूचे जरा तरी भान ठेवा, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com