Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

CCTV Footage: धावत्या बसमधून खाली पडणाऱ्या तरुणीचे बस कंटक्टरने वाचवले प्राण, पाहा घटनेचा थरारक VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका बसच्या कंडक्टरने धावत्या बसमधून पडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bus Conductor Saves Woman

देशभर रोज अनेक व्यक्ती प्रवास करत असतात. कोण रेल्वेतून तर कोण आपल्या स्वत:च्या कारमधून तर कोणी बसमधून प्रवास करतात. या प्रवासात प्रवाशासोबत अनेक गमतीदार किस्से तर अनेक भयानक गोष्टी घडतात. काही घटना या प्रसंग घडलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद होतात किंवा एखादा व्यक्ती क्षणात त्या गोष्टी कैद करतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका बसच्या कंडक्टरने धावत्या बसमधून पडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ तमिळनाडूमधील इरोडा येथील आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बसचा मार्ग इरोडहून मेत्तूरचा असा होता. संपूर्ण धक्कादायक घटना बसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, एका बसमध्ये अनेक प्रवासी बसलेले आहेत. कोणी फोनवर बोलताना दिसत आहे तर कोणी आपल्याला गोष्टीमध्ये व्यस्त आहे तसेच एक व्यक्ती बसच्या मधोमध उभा आहे तर बस कंडक्टर दरवाजाजवळ उभा आहे. बसचा वेगही जास्त वाटत आहे.

अशातच एक तरुणी बसमधून उतरण्यासाठी पुढे येते. तेवढ्यात बसचा ब्रेक लागल्यामुळे उभी असलेली तरुणी चक्क धावत्या बसच्या दरवाजातून पडते मात्र कंडक्टरने तिच्या केसांना पकडून बसमध्ये तिला ओढले. त्यानंतर तरुणीने बसमधून खाली पडलेले तिचे सामान आणून तिला परत बसमध्ये आल्यावर पाणी प्यायला दिले जाते. कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे तरुणीला वाचवण्यात यश येते.

सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @HateDetectors या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Children diabetes risk: गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका; चुकीच्या आहाराच्या सवयी पालकांनी कशा बदलाव्या?

SCROLL FOR NEXT