Buldhana Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Buldhana Viral Video: मॉर्निंग वॉकसाठी हटके स्टाईलमध्ये आवाहन.. मित्रमंडळी थेट बँड वाजवत दारात हजर; VIDEO

Viral Video News: तरुणांच्या या भन्नाट आयडियाने झोपाळू मित्राची कायमचीच झोप उडाली. बुलढाण्यातील व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी

Buldhana Viral Video:

झोप म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय. तुमच्याही काही मित्रांना, मैत्रिणींना झोपायला प्रचंड आवडत. काहीजण सकाळी उशिरापर्यंत झोपूनही, ऑफिसमध्ये, बसमध्ये शाळेत जिथे संंधी मिळेल तिथे डुलक्या मारत असतात.

अशाच एका झोपाळू तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झोपेच्या नादात हा गडी मॉर्गिंग वॉकलाच येईना, म्हणूनच त्याच्या मित्रांनी अशी आयडिया केली की त्याची कायमचीच झोप उडेल. बुलढाण्यातील या व्हिडिओची अख्ख्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

अतरंगी मित्र कुठे डोकं लावतील अन् काय आयडिया शोधून काढतील ह्याचा काही नेम नाही. आपल्या चांगल्या वाईट सगळ्या सवयी मित्रांनाच माहित असतात आणि यातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल ह्याचा जालीम उपायही त्यांच्याकडे असतो. सध्या बुलढाण्यातील एका अतरंगी मित्रांच्या टोळीच्या असाच भन्नाट प्रतापाची सगळ्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.

बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडलेलं हे प्रकरण. झालं असं की चार- पाच मित्र रोज सकाळी ठरवून लवकर उठून मॉर्निंग वॉकला जायचे. ठरलेल्या वेळेत सगळे एकत्र व्हायचे अन् निवांत गप्पा गोष्टी करत सकाळचा फेरफटका मारायचे. मात्र त्यांच्यामधील एक मित्र ३ दिवस झाले, सकाळचा मॉर्निंग वॉकलाच येईना, फोन केले, सुचना दिल्या पण हा गडी काही झोप सोडून सकाळचा उठायलाच तयार नव्हता.

यावर उपाय म्हणून या मित्रांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली. हे सर्वजण सकाळी सकाळी उठून थेट बँडवाल्याला घेवूनच झोपाळू मित्राच्या दारात पोहोचले अन् जोरजोरात वाजवायला सुरूवात केली. मित्रांच्या या गोंधळाने झोपाळू मित्र लगेच उठून आला. आपल्या मित्रांनी शोधलेली ही आयडिया पाहून तो थक्कच झाला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मित्रांची टोळी बँडबाजासोबत घेवून मित्राच्या दारात जोरजोरात वाजवत आहे. झोपाळू मित्रासाठी केलेली ही आयडिया सध्या सर्वत्र चांगलीच चर्चेत आली असून सोशल मीडियावर व्हि़डिओची तुफान चर्चा होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT