Nashik  Saam tv
व्हायरल न्यूज

Bride and Groom Entry Viral Video : वारेमाप खर्चाला फाटा! बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; वऱ्हाडी टकमक पाहतच राहिले

Vishal Gangurde

Groom Entry Viral Video News in Marathi :

लग्न म्हटलं तर शहर असो किंवा ग्रामीण भाग... पैशांची उधळपट्टी सर्रास पाहायला मिळते. शहर आणि ग्रामीण भागातही तरुणाईमध्ये प्री-वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ दिसत आहे. दुसरीकडे लग्नाच्या दिवशी लग्नमंडपात हटके एन्ट्री करण्यासाठीही हजारो-लाखो रुपये मोजण्यास लोक तयार असतात. काही जण हॅलिकॉप्टरनेही लग्नमंडपात एन्ट्री मारतात. मात्र, याच आधुनिक पद्धतीला फाटा देत एका नवरदेवाने लग्नमंडपात हटके एन्ट्री मारली आहे. या नवरदेवाची सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

लग्न सोहळा म्हटलं की नवरदेव-नवरी मंडपात येताना अनेक फंडे वापरत असतात. मात्र नाशिकच्या येवला तालुक्यात रविवारी एका विवाह सोहळ्याचा हटके व्हिडिओ चर्चेत आला आहे.

येवल्याच्या कुसूर गावात झालेल्या विवाह सोहळ्यात टांगा शर्यतप्रेमी असलेला नवरदेव मंडपात येतानाच चक्क टांगा शर्यतीच्या बैलजोडीत आला. इतकेच नाही, तर सोबत होणाऱ्या बायकोसोबतही मंडपात हटके एन्ट्री मारली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न मंडपात नवरा आणि नवरीने 'बहारो फुल बरसोओ' या गाण्यावर एन्ट्रीवर मारली. आधुनिक पद्धतीला फाटा देत बैलगाडा शर्यतप्रेमीचा हा अनोखा विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे. या नवरदेवाची हटके एन्ट्री व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहे.

येवला तालूक्यातील विसापूर येथील महेश सोनवणे आणि कुसूर येथील काजल गायकवाड अशी या वधू-वरांची नावे आहेत. लग्न म्हटल्यावर प्रत्येक वधू-वराचे एक वेगळे स्वप्न असते. त्यात मात्र ग्रामीण भागातील टांगा शर्यतप्रेमीने आपल्या लग्नाचा सोहळा आणि मंडपातील एन्ट्रीने सर्वांनाच भुरळ घातली. यासाठी टांगा प्रेमी असलेल्या त्याच्या मित्रांची त्याला साथ मिळाल्याने वधू-वरांची मंडपातील एन्ट्री आगळी-वेगळी ठरत ती सर्वत्र चर्चेचा विषय बनली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Vakri 2024: ऑक्टोबर महिन्यात गुरु चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maratha Reservation: आरक्षणासाठी एल्गार! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड, धाराशिव जिल्हा बंद; रविवारी पुणे, परभणी 'जिल्हा बंद'ची हाक

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT