PM Modi In Kazan 
व्हायरल न्यूज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

PM Modi: कझानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कझान विमानतळ आणि कोर्स्टन हॉटेलमध्ये भव्यपणे स्वागत करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

बिक्स परिषदेत सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील कझान शहरात पोहोचले आहेत. येथे ब्रिक्सची १६ वी बैठक घेतली जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे. पीएम मोदी आज सकाळी कझान येथील विमानतळावर दुपारी पोहोचले. त्यावेळी त्यांचे भव्यपणे स्वागत करण्यात आले. पण कोर्स्टन हॉटेलमध्ये झालेले स्वागत पाहून पीएम मोदी भारावून गेलेत.

पंतप्रधान मोदींचे ज्या प्रकारे स्वागत झालं ते पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भारावून गेलेत. त्यांना पंतप्रधान मोदींच्या स्वागताचा व्हिडिओ एक्सवर शेअर केलाय. कोर्स्टन हॉटेलवर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदीचं स्वागत एका भजनाने करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेथील नागरिकांना हरे कृष्णा, हरे रामा या भजनाने पंतप्रधान मोजींचे स्वागत करण्यात आले आहे. भारतीय समुदाय कझानमधील कॉर्स्टन हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचे लोकांनी स्वागत केले.

पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक उभे होते. अनेक भारतीय महिलांनी साड्या आणि इतर पारंपारिक पोशाख परिधान केला होता.

पंतप्रधान मोदी विशेष विमानातून बाहेर येताच तीन रशियन मुली पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लाडू आणि केक घेऊन आल्या.विमानतळावर पंतप्रधानांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक रशियन अधिकारीही विमानतळावर उपस्थित होते. मागील चार महिन्यात पीएम मोदी दुसऱ्यांदा रशियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी ८ आणि ९ जुलै रोजी मास्कोला गेले होते. पीएम मोदींची ती द्विपक्षीय भेट होती आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी विविध मुद्द्यांवर दीर्घ संवाद साधला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान अनेक देशांच्या नेत्यांशी द्विवशीय चर्चा करतील. यातील महत्त्वाची भेट म्हणजे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी असेन. कारण दीर्घकाळापासून भारत आणि चीनमध्ये सीमेरेषेवरून तणाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT