Gadar 2 Screening Fight Video Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Gadar 2 Movie Show : 'गदर- २' बघायला थिएटरमध्ये गेले, 'गदर - ३' बघून आले; मॉलमध्येच कुटाकुटी, VIDEO व्हायरल

Gadar 2 Screening Fight Video Viral : चित्रपटाच्या एका शो दरम्यान प्रेक्षक आणि थिएटरच्या स्टाफमध्ये जोरदार मारामारी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gadar- 2 Fans beaten by Theater Staff at Kanpur Mall

अभिनेता सनी देओलचा गदर २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर हा चित्रपट बघून आल्यानंतर चाहते थिएटरबाहेर धम्माल करत आहेत. पण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका थिएटरमध्ये जणू 'अॅक्शन पॅक्ड' गदर - ३ बघायला मिळतोय असं काही प्रेक्षकांना वाटलं असेल. कारणच तसं आहे. चित्रपटाच्या एका शो दरम्यान प्रेक्षक आणि थिएटरच्या स्टाफमध्ये जोरदार मारामारी झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सनी देओल, अमिषा पटेल यांचा गदर २ हा चित्रपट सध्या गाजतोय. जबरदस्त स्टोरी, कमालीची संवादफेक, सनी देओलची अॅक्शन प्रेक्षकांना कमालीची भावलीय. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटानं २५० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवलाय.

या चित्रपटाची गल्लीबोळात चर्चा आहे.एकीकडे या चित्रपटात प्रेक्षकांना 'खोटी-खोटी' मारामारी बघायला मिळाली असली तरी, कानपूरच्या एका थिएटरमध्ये याच चित्रपटाच्या शो दरम्यान खरीखुरी हाणामारी बघायला मिळाली.

कानपूरच्या एका मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये गदर २ (Gadar 2)चा शो होता. या शो दरम्यान थिएटरमधला एसी बंद पडला. प्रेक्षकांनी कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले. पण एवढ्यावरच विषय थांबला नाही. त्यांच्यात बाचाबाची झाली. नंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. थिएटरमधील स्टाफने वाद घालणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केली.

बराच वेळ झाला तरी एसी सुरू झाला नाही. त्यामुळं प्रेक्षकांनी तिकीटाचे पैसे परत मागितले. त्यावरून वाद झाला आणि मग हाणामारी झाली, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपटगृहातील काही कर्मचारी एका प्रेक्षकाला मारहाण करताना त्यात दिसत आहेत. मारहाण होत असताना तिथं पोलीसही होते. ते मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी दोन्ही पक्षकारांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT