Salman Khan In Train Saam TV
व्हायरल न्यूज

Salman Khan In Train: मुंबई लोकलमध्ये सलमान खान! जबरदस्त डान्स स्टेप्सने प्रवाशांचं लक्ष वेधलं; रील VIDEO व्हायरल

Salman Khan In Mumbai Local: अरे हा सलमान खान आहे का? मुंबई लोकलमध्ये नो एन्ट्रीवर जबदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Ruchika Jadhav

Viral Video:

बॉलिवूडच्या भाईजानचे म्हणजेच सलमान खानचे लाखो चाहते आहेत. अगदी लहान मुलं, तरुण मंडळी आणि वयोवृद्धांना देखील सलमानची अॅक्टींग आणि डान्स फार आवडतात. सलमान सारखे बायसेप आणि सिक्सपॅक यावेत म्हणून तरुण मुलं मोठी मेहनत घेतात. बऱ्याच मुलांनी सलमान सारखी बॉडीही बनवली आहे. अशात एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा तरुण हुबेहूब सलमान सारखा दिसत आहे. (Latest Marathi News)

मुंबई लोकल ट्रेन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. मुंबई लोकलमध्ये कधी हाणामाऱ्या तर कधी रील्स व्हिडीओ व्हायरल होतात. आता देखील मुंबई लोकल ट्रेनमधला एक रील व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण "इश्क की गली वीच नो एन्ट्री" या गाण्यावर डान्स करत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण अगदी सलमान खानसारखा दिसतोय. त्याची बॉडी आणि चालण्याची पद्धत तसेच डान्स स्टेप्स अगदी सलमान सारख्या आहेत. त्याच्या डान्समुळे ट्रेनमधील प्रवासी देखील चकित झालेत. या तरुणाने जबरदस्त डान्स स्टेप्स करत मुंबई लोकलमधील प्रवाशांचं मनोरंजन केलं आहे.

त्याच्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर सलमान खान मुंबई लोकल ट्रेनमध्ये आला होता असं म्हटलं जातंय. तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलमानच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तरुणाचं कौतुक केलंय. तसेच या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

@mumbaimatterz या ट्वीटर (एक्स) अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर रोजी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत व्हिडीओला २ लाख ४३ हजारांहून अधिक व्हूव्ज मिळालेत. या आधी देखील मुंबई लोकलमध्ये एका तरुणीचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT