मृत्यू कधी अन् कोणत्या रुपात येईल हे सांगणे अशक्य.. अगदी चालता- बोलता, हसता- खेळता मृत्यू आल्याचे अनेक प्रसंग आजपर्यंत ऐकले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आठवीतील मुलीचा वर्गातच ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना गुजरातच्या सुरतमधील आहे. सूरतमधल्या गोडादरा इथल्या शाळेत १२ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला. वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच मुलीला अस्वस्थ वाटू लागते. आणि काही क्षणात ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते.
अचानक घडलेल्या या घटनेने वर्गातील शिक्षिकेसह मुलेही घाबरुन गेली. शिक्षिकेने मुलीला लगेच उठवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी काहीच हालचाल करत नसल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये वर्गात शिक्षिका शिकवत असल्याचे दिसत आहे. अचानक पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलीला अस्वस्थ वाटू लागते. बघता- बघता ती खाली कोसळते, ज्यामुळे सगळेच घाबरुन जातात. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आल्याने मुलीच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गणेश चतुर्थी (Ganapati Festival 2023) दिवशी मंडपात नाचता नाचताच हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे घडली. प्रसाद (वय 26 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. हा मृत्यूचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.