Grandfather Dance
Grandfather DanceSaam TV

Grandfather Dance: वय फक्त आकडाच! मेरा नाम मेरी है गाण्यावर आजोबा बेभान होऊन नाचले, पाहा VIDEO

Grandfather Dance Viral Video: व्हिडीओत लहान मुलं बाप्पाला निरोप देताना रडतायत तर काही जण डीजेच्या तालावर डान्स करत आहेत.
Published on

Mera Naam Mary Dance:

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगमन आणि विसर्जन झाल्यानंतर आता सोशल मीडियावर मिरवणुकीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही व्हिडीओत लहान मुलं बाप्पाला निरोप देताना रडतायत तर काही जण डीजेच्या तालावर डान्स करत आहेत. यातील काही व्हिडीओ अगदी चकित करणारेही आहेत. (Latest Marathi News)

Grandfather Dance
MP Bus Accident: भरधाव बस २५ प्रवाशांसह थेट नदीत कोसळली, थरारक VIDEO आला समोर

डीजेच्या तालावर गाणं वाजू लागलं की, सर्वजण भान हरपून नाचतात. यामध्ये अगदी तरुण आणि लहान मुलांसह वृद्ध व्यक्ती देखील जबरदस्त ठेका धरतात. अशात सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. आजोबांचा डान्स पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

वृद्ध व्यक्ती म्हटल्यावर ते अगदी अंग धरुन मोजकंच नाचतात. मात्र हे आजोबा गाण्यांच्या ठेक्यावर अगदी बिनधास्त झालेत. विसर्जनावेळी त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आहे. मेरा नाम मेरी है या गाण्यावर आजोबांनी ताल धरला आहे. त्यांच्या शेजारी काही महिला देखील नाचत आहेत. बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना आजोबांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले.

त्यांच्या डान्स स्टेप्स अगदी कमाल होत्या. त्यांचा हा व्हिडीओ @civicmirror या इंन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आजोबांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्यात. आजोबांचा डान्सपाहून एकाने म्हटलंय की, यांच्या वयाचा मलाही विसल पडला.

Grandfather Dance
Urfi Javed New Video: हाय हिल्स घालणं उर्फीला पडलं महागात, भररस्त्यात पडता पडता वाचली; VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com