Black Ant Pizza Saam TV
व्हायरल न्यूज

Black Ant Pizza : काळ्या मुंगळ्यांचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Black Ant Pizza Viral Video : पदार्थांमध्ये असे किटक सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे काही सापडल्यास त्या कंपनीचे फूड लायसन रद्द केले जाते. मात्र सोशल मीडियावर सध्या थेट काळ्या मुंगळ्यांचा पिझ्झा व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video :

आपल्या जेवणात कधी चुकून केस जरी आला तरी तो पदार्थ खावासा वाटत नाही. बाहेर बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे त्यात मुंग्या, झुरळ, आळ्या आढळून येतात. पदार्थांमध्ये असे किटक सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे काही सापडल्यास त्या कंपनीचे फूड लायसन रद्द केले जाते. मात्र सोशल मीडियावर सध्या थेट काळ्या मुंगळ्यांचा पिझ्झा व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पिझ्झा शॉपमध्ये चीझ आणि विविध टॉपिंगसह एक पिझ्झा बनवण्याचे काम सुरू आहे. पिझ्झा कसा बनवला जातोय याची पूर्ण प्रोसेस यात दाखवली गेली आहे. सुरुवातीला पिझ्झा बेसवर सर्व प्रकारच्या चटणी आणि सॉस लावून घेतले आहेत. त्यानंतर त्यावर भरपूर चीझ टाकलं आहे. आता टॉपिंग म्हणून यावर थेट काळे मुंगळे टाकण्यात आले आहेत. काळे मुंगळे असलेला हा पिझ्झा मस्त ओव्हनमध्ये बेक करून घेतला आहे.

त्यानंतर कट करून हा पिझ्झा सरर्व्ह करण्यात आला आहे. आता या पिझ्झाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @pizzariadiogolira या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र हा व्हिडिओ साऊथ कोरियाचा असावा असं म्हटलं जातं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट केल्यात. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स आणि व्हुव्ज मिळालेत.

डॉमिनोज किंवा पिझ्झाहटमध्ये वेजसह नॉनव्हेज पिझ्झा म्हणून चिकन पिझ्झा मिळतो. काही ठिकाणी प्रॉन्स पिझ्झा देखील मिळतो. मात्र मुंगळे असलेला हा पिझ्झा पहिल्यांदाच पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाल मुंग्यांची चटणी व्हायरल झाली होती. एका गावातील काही व्यक्ती अशी चटणी खातात.

याचबरोबर मच्छरांपासून बनवलेला बर्गर देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आफ्रिकेतील एका दुर्गम भागात व्यक्तींना दोन वेळचं जेवण देखील मिळत नाही. अशात स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील व्यक्ती मच्छरांपासून पदार्थ बनवून खातात. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: भाजपने तिकीट कापलं, कार्यकर्त्याने थेट शापच दिला

Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT